ट्रम्प यांचे व्यापार सल्लागार पीटर नवारो यांचे वक्तव्य

वॉशिंग्टन – चीनमध्ये झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यात विशेष बैठक झाली. या भेटीमुळे अमेरिका अस्वस्थ झाली असून राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांचे व्यापार सल्लागार पीटर नवारो यांनी भारताच्या भूमिकेवर टीका केली आहे. ‘फ्री प्रेस जर्नल’ने याविषयीचे वृत्त प्रसारित केले आहे. या वृत्तानुसार नवारो म्हणाले, ‘‘भारताने रशियासमवेत नव्हे, तर अमेरिकेसमवेत रहावे. मोदी एकीकडे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि दुसरीकडे पुतिन यांच्यासोबत हातमिळवणी करत आहेत, हे आम्हाला मान्य नाही. भारत अन्याय्य व्यापार करत असून रशियाकडून तेल खरेदी करत आहे. हाच पैसा रशिया युद्धासाठी वापरतो. त्यामुळेच आम्ही भारतावर हा कर लादला आहे. भारताच्या कृतीमुळे युक्रेन युद्धाला अप्रत्यक्ष समर्थन मिळत आहे.’’
संपादकीय भूमिकाभारताने काय करावे आणि काय करू नये ?, हे सांगणारी अमेरिका कोण ? अमेरिकेने इतर देशांच्या प्रश्नात नाक खुपसण्यापेक्षा अगोदर स्वतःच्या देशातील समस्यांकडे पहावे, असे भारताने अमेरिकेला ठणकावले पाहिजे ! |
ED Investigation : भारतात बांगलादेशी आणि रोहिंग्या यांची घुसखोरी करण्यासाठी विदेशातून अर्थपुरवठा !
संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !
‘इंडो-पॅसिफिक’ : २१ व्या शतकातील भारताच्या सुरक्षेचा नवा महामार्ग !
कर्णावती (गुजरात) बाँबस्फोट प्रकरणाच्या खटल्याचा निकाल : भारतीय राज्याच्या उत्क्रांतीतील एक धोरणात्मक मैलाचा दगड !
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
Oil purchase from Russia : रशियाकडून तेलखरेदी करणार्या भारतासह ५ देशांवर अमेरिका लादणार १०० टक्के शुल्क !