(म्हणे) ‘हिंदी आणि उर्दू भारताच्या भाषा, तर संस्कृत बाहेरून आली !’ – Congress MP Mohammad Javed

काँग्रेसचे खासदार महंमद जावेद यांचे विधान

काँग्रेसचे खासदार महंमद जावेद

किशनगंज (बिहार) – हिंदी आणि उर्दू या आपल्या देशाच्या भाषा आहेत; परंतु संस्कृत ही बाहेरून आलेली भाषा आहे, असे विधान येथील काँग्रेसचे खासदार महंमद जावेद यांनी बिहारमधील नवीन पदवी महाविद्यालयांमध्ये उर्दू विषय शिकवण्यावरून चालू असलेल्या वादावर केले.

खासदार महंमद जावेद यांनी बिहारमधील भाजप आघाडी सरकारवर आरोप केला की, सरकारने नुकत्याच चालू केलेल्या नवीन पदवी महाविद्यालयांमध्ये उर्दू विषयाचे शिक्षण चालू केलेले नाही. हा निर्णय उर्दू भाषिक विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा असून सरकारने यावर त्वरित पुनर्विचार करावा. बिहारमध्ये उर्दू भाषिक विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे; परंतु नवीन महाविद्यालयांमध्ये त्यांच्यासाठी उर्दू विषयाची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. सर्व नवीन पदवी महाविद्यालयांमध्ये उर्दू विभाग चालू करण्यात यावा, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या भाषेत उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळेल, अशी मागणीही त्यांनी केली.

संपादकीय भूमिका

हे विधान असत्य आहे, हे शेंबडे पोरही सांगेल. त्यामुळे असे विधान केवळ आणि केवळ हिंदुद्वेषातून करण्यात आलेले आहे. या विधानावरून जावेद यांच्या विरोधात धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे !