अंमलबजावणी संचालनालयाच्या चौकशीत उघड
नवी देहली – अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने -एन्फोर्समेंट डायरेक्टरेट) बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना भारतात स्थायिक करण्यात एक मोठे जाळे कार्यरत असल्याचे उघड केले आहे. या संदर्भात उत्तरप्रदेश, देहली, हरियाणा, बंगाल आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये ‘ईडी’ने धाडी घातल्या. हे जाळे परदेशातून मिळालेल्या पैशांचा वापर घुसखोरांचे बनावट दस्तऐवज सिद्ध करण्यासाठी, त्यांना देशाच्या विविध भागांत पाठवण्यासाठी आणि त्यांच्या उपजीविकेची व्यवस्था करण्यासाठी करत होते. या जाळ्याचे धागेदोरे आतंकवादी अर्थपुरवठ्याशी जोडलेले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
💰 Foreign Funds Fueling Illegal Infiltration?
ED has revealed that foreign funding was used to facilitate the infiltration of Bangladeshi and Rohingya migrants into India.
🔹 Simultaneous raids at 13 locations across 5 states.
🔹 ₹40 lakh in cash and 180 grams of gold coins… https://t.co/69qom08zzV pic.twitter.com/LWX8BgM513
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 17, 2026
१. ‘ईडी’ने उत्तरप्रदेशातील सहारनपूर (देवबंद), देहलीतील जामिया नगर, हरियाणातील बल्लभढ, बंगालमधील दक्षिण २४ परगणा, उत्तर २४ परगणा आणि मुर्शिदाबाद, तसेच महाराष्ट्रातील रायगड अशा एकूण १३ ठिकाणांवर एकाच वेळी धाडी घातल्या.
२. या धाडीमध्ये बंगालमधील कलिकापूर भागातील ‘हरोरा अल-जामियातुल इस्लामिया दारुल उलूम’मधून ४० लाख रुपये रोख आणि १८० ग्रॅम सोन्याची नाणी जप्त करण्यात आली आहेत.
३. ‘ईडी’ अशा टोळीच्या कारवायांचा तपास करत आहे, जी ‘परकीय चलन विनियमन कायद्यां’तर्गत (‘फेरा’ – फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ॲक्ट) नोंदणीकृत ट्रस्ट आणि स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून कार्यरत आहे, अशी माहिती अधिकार्यांनी दिली.
४. घुसखोरांना साहाय्य करणार्या जाळ्यासह काही न्यास, स्वयंसेवी संस्था आणि शैक्षणिक संस्था यांच्याशी संबंधित व्यवहारांची चौकशी केली जात आहे. अनेक बँक खात्यांच्या वापराचीही चौकशी केली जात आहे.
५. यापूर्वी उत्तरप्रदेश आतंकवादविरोधी पथकाच्या अन्वेषणात समोर आले आहे की, काही संस्थांना विदेशी देणग्या मिळाल्या आणि अवैध कारवायांना साहाय्य करण्यासाठी बँक खाती, मध्यस्थांची खाती आणि गुंतागुंतीच्या व्यवहारांद्वारे पैसे हस्तांतरित करण्यात आले. संशयितांना भारतात स्थायिक करण्यासाठी ६, ८ आणि १० सहस्र रुपयांच्या छोट्या हप्त्यांमध्ये पैसे पाठवले गेले.

‘डॉ. डी.वाय. पाटील बी-स्कूल’मध्ये आर्थिक अपव्यवहार प्रकरणी माजी संचालकाच्या विरोधात गुन्हा नोंद !
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प
US Attack Chabahar port : अमेरिकेचे इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठे आक्रमण
BLA Attack : पाकिस्तानच्या सैन्य ताफ्यावर आक्रमण करून ४५ हून अधिक सैनिकांना ठार मारले ! – ‘बलुच लिबरेशन आर्मी’चा दावा
China Uyghur Muslims : संस्कृती आणि भाषा नष्ट करण्याचे चीन सरकारचे कारस्थान असल्याचा आरोप
संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !