७ जणांना अटक !

बेळ्तंगडी (कर्नाटक ) – येथील कणीयूर गावातील अडेंजा येथे एका निर्जन इमारतीत एका टोळीकडून इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करून भारतीय बनावट चलनी नोटांची छपाई केली जात असल्याचे पोलिसांनी उघड केले. पोलीस उपनिरीक्षक सुतेश के.पी. यांच्या नेतृत्वाखालील पथकाने १६ जुलैला या इमारतीवर धाड घातली. या कारवाईत ७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये इब्राहिम, शरीफ, संदीप शोळंबी, महंमद नबास, सलमान फारिस, सिराजुद्दीन आणि इरशाद या आरोपींचा समावेश आहे. या वेळी बनावट नोटांच्या छपाईसाठी वापरली जाणारी उपकरणेही जप्त करण्यात आली आहेत.
ही कारवाई कोडगू जिल्हा पोलीस अधीक्षक बिंदू मणी आर्.एन्. (आय.पी.एस्.) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या प्रकरणी उप्पिनंगडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
JeM Terrorist Arrested : गुजरातमध्ये जैश-ए-महंमदशी संबंधित ५ आतंकवाद्यांना अटक
हरियाणातील अल्-फलाह वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी अदीदशाह याला गांजासह अटक !
China Uyghur Muslims : संस्कृती आणि भाषा नष्ट करण्याचे चीन सरकारचे कारस्थान असल्याचा आरोप
माफियांना नरकात किंवा कारागृहातच पाठवणार ! – CM Yogi Adityanath
(म्हणे) ‘हिंदी आणि उर्दू भारताच्या भाषा, तर संस्कृत बाहेरून आली !’ – Congress MP Mohammad Javed
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात