अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांचा ट्रम्प यांना घरचा अहेर !

वॉशिंग्टन – अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांच्या भारत धोरणावर तीव्र टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ट्रम्प यांच्या विनाशकारी आयात शुल्क धोरणामुळे अमेरिका आणि भारत यांच्यामध्ये दशकांपासून निर्माण होत असलेले धोरणात्मक आणि आर्थिक संबंध धोक्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेमधील उपस्थितीविषयीही बोल्टन यांनी चिंता व्यक्त केली. पंतप्रधान मोदी, शी जिनपिंग आणि व्लादिमिर पुतिन यांचे एकत्रितपणे हसतांनाच्या प्रसिद्ध झालेल्या छायाचित्राविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना बोल्टन यांनी ‘हा अमेरिकेसाठी एक प्रकारचा संदेश आहे’, अशी चेतावणी दिली.
बोल्टन यांनी ‘स्काय न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की,
१. पश्चिमेकडील देशांनी शीतयुद्धाच्या काळात भारताला सोव्हिएत रशियाच्या प्रभावापासून दूर ठेवण्यासाठी मोठे प्रयत्न केले होते; मात्र ट्रम्प यांच्या अपयशी धोरणांमुळे ते उद्ध्वस्त झाले.
२. ट्रम्प यांच्या काळात भारतासमवेत विश्वासाचा दुवा खंडित झाला. विशेषतः ट्रम्प यांनी भारतावर आयात शुल्क लादल्यामुळे भारतात अप्रसन्नता पसरली आणि चीनने याचा लाभ उठवत भारताशी जवळीक वाढवली.
३. ट्रम्प यांच्या संकुचित आर्थिक दृष्टीकोनामुळे अमेरिका तिचा जागतिक प्रभाव गमावण्याच्या मार्गावर आहे.
ट्रम्प-पुतिन भेटीमुळे युक्रेनमधील युद्ध आणखी भडकले!
जॉन बोल्टन यांनी अलास्कामध्ये डॉनल्ड ट्रम्प आणि व्लादिमिर पुतिन यांच्यात झालेल्या शिखर परिषदेवरही टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ट्रम्प-पुतिन भेट फार वाईट होती आणि त्यामुळे युक्रेनमधील युद्ध आणखी भडकले. या बैठकीतून ट्रम्प काहीही साध्य करू शकले नाहीत. युक्रेनविषयीच्या रशियाच्या धोरणात थोडाही पालट झालेला नाही. जॉन बोल्टन यांनी अलीकडेच ट्रम्प यांच्या भारताच्या संदर्भातील धोरणांवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर अमेरिकेची अन्वेषण यंत्रणा एफ्.बी.आय.ने त्यांच्या घरावर धाड घातली होती.
देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने वारीत अपघाती मृत्यू झाल्यास १ लाख रुपयांचे साहाय्य !
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
Punjab Extortion Case : पंजाब पोलिसांकडून खंडणीच्या प्रकरणी पोलीस निरीक्षकाला अटक
‘Vikram-1’ Creates History : देशातील पहिल्या खासगी आस्थापनाकडून उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण
Hormuz Oil Tankers Explodes : हॉर्मुझमध्ये २ तेल टँकर नौकांमध्ये स्फोट
Bullet Train Project : बुलेट ट्रेन प्रकल्पाला विलंब होण्यास भारतीय मंत्र्याचे वर्तन उत्तरदायी