शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेनंतर डॉनल्ड ट्रम्प यांचे बेताल वक्तव्य !

वॉशिंग्टन – भारताने आयातीवरील शुल्क न्यून करण्याचे आश्वासन दिले होते; पण आता विलंब झाला आहे, असे वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी केले.
भारताने रशियाकडून मोठ्या प्रमाणावर तेल आणि संरक्षण उपकरणे खरेदी केल्याच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी हे वक्तव्य केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेत सहभागी होऊन भारतात परतल्यानंतर अमेरिकेच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया एकामागून एक समोर येत आहेत. परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची एकत्रित छायाचित्रे प्रसारित झाल्यामुळे अमेरिकेत चिंता वाढली आहे. तज्ज्ञांच्या मते, भारताने या व्यासपिठावरून अमेरिकेला ‘आम्ही कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही’, असा स्पष्ट संकेत दिला आहे.
ट्रम्प यांचा आडमुठेपणा चीनच्या पथ्यावर !
ट्रम्प यांच्या या मनमानी कारभारावर अमेरिकेतूनच जोरदार टीका होत आहे. माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी ट्रम्प यांच्या आयात शुल्क वाढीच्या धोरणाला ‘विनाशकारी’, असे संबोधले. त्यांचे म्हणणे आहे की, या धोरणामुळे भारताला रशियापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न फसला आणि चीनला जागतिक पातळीवर पुन्हा बळकट होण्याची संधी मिळाली.

Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
Punjab Extortion Case : पंजाब पोलिसांकडून खंडणीच्या प्रकरणी पोलीस निरीक्षकाला अटक
‘Vikram-1’ Creates History : देशातील पहिल्या खासगी आस्थापनाकडून उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण
Hormuz Oil Tankers Explodes : हॉर्मुझमध्ये २ तेल टँकर नौकांमध्ये स्फोट
Bullet Train Project : बुलेट ट्रेन प्रकल्पाला विलंब होण्यास भारतीय मंत्र्याचे वर्तन उत्तरदायी
‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्र : २१व्या शतकातील जागतिक समृद्धी आणि सुरक्षा यांची चावी !