हिंदूंचा विरोध !
हिंदूंच्या देवतांचा द्वेष केल्याचा मुसलमान असलेल्या बानू मुश्ताक यांचा इतिहास !

बेंगळुरू (कर्नाटक) – यंदा बुकर पारितोषिक विजेत्या असलेल्या हिंदुद्वेषी लेखिका बानू मुश्ताक यांच्या हस्ते विश्वविख्यात मैसुरू दसरा सणाचे उद्घाटन होणार आहे, अशी घोषणा कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नुकतीच केली. त्यावरून राज्यभरातील हिंदु नेत्यांकडून विरोध केला जात आहे.
🧵 Karnataka Dasara Row: Why Banu Mushtaq’s Invitation Sparked Outrage
1/ Karnataka CM Siddaramaiah announced that anti-Hindu writer Banu Mushtaq will inaugurate the world-famous Mysuru Dasara festival this year.
Banu Mushtaq has a history of criticizing Hindu deities
👉 The… pic.twitter.com/GMt6Q0DfYu
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 26, 2025
देवीची पूजा करणे बानू मुश्ताक यांच्या धार्मिक विश्वासाच्या विरुद्ध ! – आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ

मी वैयक्तिकरित्या बानू मुश्ताक यांचा लेखिका आणि कार्यकर्त्या म्हणून आदर करतो; परंतु चामुंडेश्वरी देवीला पुष्पार्पण करून आणि दिवा लावून दसरा सणाचे उद्घाटन करणे त्यांच्या स्वतःच्या धार्मिक विश्वासाच्या विरुद्ध आहे, असे वक्तव्य आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी केले.

दसरा हे धर्मनिरपेक्षतेचे प्रतीक नाही, तर एक धार्मिक विधी ! – भाजपचे माजी खासदार प्रताप सिम्हा

बानू मुश्ताक यांच्या साहित्याविषयी मला आदर आहे; परंतु दसरा हे धर्मनिरपेक्षतेचे प्रतीक नाही. दसरा १०० टक्के धार्मिक विधी आहे. आई चामुंडेश्वरीची पूजा करून दसर्याला आरंभ होतो. बानू मुश्ताक यांना आई चामुंडेश्वरीवर विश्वास आहे का, हे त्यांनी सांगावे. धार्मिक विश्वासाचा विरोध करणार्यांना मुख्यमंत्री का बोलावतात ?, असा संतापही सिम्हा यांनी व्यक्त केला.

सिम्हा पुढे म्हणाले की, इस्लाम मूर्तीपूजेचा तिरस्कार करतो आणि केवळ एक देव आणि एक ग्रंथ मानतो. या विश्वासावर बानू मुश्ताक या अजूनही कायम आहेत कि ‘सर्व मार्ग शेवटी एकाच मुक्तीकडे जातात’, असे त्यांना वाटते ?
संपादकीय भूमिका
|

बानू मुश्ताक यांचा हिंदुद्वेष !वर्ष २०२३ मध्ये झालेल्या ‘जन साहित्य संमेलन’ कार्यक्रमात बानू मुश्ताक यांचा हिंदुद्वेष पहायला मिळाला होता. त्या म्हणाल्या होत्या की, तुम्ही कन्नड भाषेला ‘कन्नड भुवनेश्वरी’ बनवले आहे. केशरी आणि पिवळा, हळद-कुंकवाचा ध्वज लावून, हळद-कुंकू लावून भुवनेश्वरीला सिंहासनावर बसवले आहे. मी कुठे उभे राहू ? मी काय पाहू ? मी कुठे सहभागी होऊ ? मला बाहेर काढण्याची प्रक्रिया आजपासून नाही, तर खूप पूर्वीपासून चालू झाली होती. ती आज पूर्ण झाली आहे.’ (अशा हिंदुद्वेषी महिलेला दसरा सणाच्या उद्घाटनासाठी निमंत्रित करणे संतापजनक होय. – संपादक) |

प्रखर हिंदुत्वनिष्ठ नेते चक्रवर्ती सुलीबेले यांनी संताप व्यक्त केला की, ‘कन्नड भुवनेश्वरीला सहन करू न शकणारे चामुंडेश्वरी मातेच्या वैभवापुढे नतमस्तक होण्यास सिद्ध होतील का ?

सरकार हिंदूंच्या भावना दुखावत आहे ! – प्रमोद मुतालिक

मैसुरू दसरा सणाच्या उद्घाटनासाठी बानू मुश्ताक यांची निवड हे राज्य सरकारचे लांगूलचालनाचे आणि मतपेटीचे राजकारण आहे. याचा श्रीराम सेना निषेध करते. चामुंडेश्वरी हिंदूंचे आराध्य दैवत आहे. अशा परिस्थितीत मुसलमान महिलेची मैसुरू दसरा सणाच्या उद्घाटनासाठी निवड करणे निंदनीय आहे. काँग्रेस सरकार हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न करत आहे.
(म्हणे) ‘एका धर्माला वगळून दसरा साजरा करणे शक्य आहे का ?’ – गृहमंत्री जी. परमेश्वर

हिंदुत्वनिष्ठांच्या विरोधावर राज्याचे गृहमंत्री जी. परमेश्वर म्हणाले की, दसरा एक प्रादेशिक सण आहे. तो कोणत्याही जाती किंवा धर्मापुरता मर्यादित नाही. एका धर्माला वगळून दसरा साजरा करणे शक्य आहे का ?
Mysuru | On the BJP questioning Booker winner Banu Mishtaq to inaugurate Mysore Dasara festival, Karnataka Minister G Parameshwara says, “It is not right to oppose this. This is not a religious issue. Dasara is a national festival.” pic.twitter.com/YzZnOZcCdX
— ANI (@ANI) August 25, 2025
मिर्झा इस्माईल यांनी दिवाण म्हणून दसरा साजरा केला नाही का ? निस्सार अहमद यांनी दसर्याचे उद्घाटन केले नाही का ? यावर आक्षेप घेऊ नये. (आधी कुणी आक्षेप घेतला नाही; म्हणून आता घ्यायचा नाही, असे परमेश्वर यांना वाटते का ? – संपादक)
संपादकीय भूमिका
|
(म्हणे) ‘बानू मुश्ताक यांना निमंत्रण देऊ नये, असे घटनेत कुठे लिहिले आहे का ?’ – काँग्रेसचे मंत्री संतोष लाड

बानू मुश्ताक यांना निमंत्रण दिल्यावरून झालेल्या विरोधाला काँग्रेसचे मंत्री संतोष लाड यांनी विरोध दर्शवला. ते म्हणाले की, दसर्याच्या उद्घाटनासाठी बानू मुश्ताक यांना निमंत्रण देऊ नये, असे राज्यघटनेत कुठे लिहिले आहे का ? भाजप प्रत्येक गोष्टीला धर्माच्या दृष्टीकोनातून विरोध करत आहे. (काँग्रेसने धर्माच्याच दृष्टीकोनातून हिंदूंना आतंकवादी आणि मुसलमानांना निरपराध ठरवण्याचा आतापर्यंत आटोकाट प्रयत्न केला आहे, हे लक्षात घ्या ! – संपादक)
लाड पुढे म्हणाले की, देशात सर्वाधिक दान कुणी केले आहे ? अझीम प्रेमजी यांनी गरिबांच्या भल्यासाठी लाखो कोटी रुपये दिले आहेत. त्यांचे योगदान घेण्याआधी आपण त्यांच्या धर्माविषयी प्रश्न विचारतो का ?, अशा प्रकारे बुद्धीभेद करण्याचा लाड यांनी प्रयत्न केला. (देशात सर्वाधिक कर हिंदू भरतात आणि अधिकाधिक सरकारी सोयीसुविधा मुसलमानांना मिळतात, ही वस्तूस्थिती आहे ! – संपादक)
संपादकीय भूमिका
|
संपादकीय : मंदिरे अध्यात्मासाठीच !
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
जिन्यामध्ये थुंकू नये म्हणून लावलेल्या देवतांच्या टाईल्स पोलीस प्रशासनाच्या साहाय्याने काढल्या !
जेजुरीतील रसायनयुक्त भंडार्याच्या विक्रीविरुद्ध भाजप आमदार विक्रम पाचपुते आक्रमक !