लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांचा न्यायालयातील लेखी जबाबातून गंभीर आरोप

मुंबई : वर्ष २००८ मध्ये एका वाहन फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी ‘हिंदु आतंकवाद’ हा शब्द उच्चारला होता. त्यानंतर लगेचच एका महिन्यात मालेगाव बाँबस्फोटाची घटना घडली. तेव्हा मध्यप्रदेशातील पंचमढी मुख्यालयात कर्नल श्रीवास्तव यांनी मला संपर्क करून बोलावून घेतले होते. तेथे माझा भ्रमणभाष काढून घेण्यात आला. मला भोपाळला नेण्यात आले. विमानतळावर गेल्यावर लक्षात आले की, माझे तिकीट देहलीऐवजी मुंबईचे आहे. भ्रमणभाषअभावी मी घरच्यांना याविषयी कळवू शकलो नाही. कर्नल श्रीवास्तव हे आतंकवादविरोधी पथकाच्या दलालाप्रमाणे (‘एजंट’प्रमाणे) काम करत होते.

मला चारचाकी वाहनात बळजोरीने बसवून खंडाळा येथील एका बंगल्यात नेण्यात आले. तेथे आधीपासूनच तत्कालीन पोलीस अधिकारी परमबीर सिंह आणि हेमंत करकरे उपस्थित होते. अशा प्रकारे माझ्या पाठीत खंजीर खुपसला गेला, असा गंभीर आरोप मालेगाव बाँबस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटलेले लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी केला. याविषयीचा उल्लेख त्यांनी न्यायालयात दिलेल्या जबाबात केला आहे.
🚨 Explosive Allegation in Court!
Lt. Col. Prasad Purohit (acquitted in the Malegaon blast case) drops a bombshell:
🧨 “The Malegaon blast happened within a month of Sharad Pawar using the term ‘Hindu terrorism’!”If the public today asks “Could Pawar have had a link to the… pic.twitter.com/Bt6hBBYmKu
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 5, 2025
शरद पवार यांनी उच्चारलेल्या ‘हिंदु आतंकवाद’ या शब्दाविषयी विचारल्यावर अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले, ‘‘या गोष्टीला २० वर्षे उलटून गेली. मला हे आता आठवत नाही.’’ (राजकारण्यांना अशा अडचणीच्या गोष्टी आठवत नसतातच ! – संपादक)
परमबीर सिंह यांचा प्रतिक्रिया देण्यास नकार !
‘साध्वी प्रज्ञासिंह यांनी केलेले आरोपही गंभीर आहेत. त्यांना झालेल्या मारहाणीत तत्कालीन पोलीस अधिकारी हेमंत करकरे, परमबीर सिंह यांच्या नावांचा समावेश होता’, असे सांगत एका वृत्तवाहिनीने परमबीर सिंह यांना संपर्क केला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. आरोपात उल्लेख असलेले रमेश कुलकर्णी यांनी भ्रमणभाष उचलला नाही, तसेच सचिन कदम यांचा संपर्क होऊ शकला नाही.
शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी मात्र ‘शरद पवार यांनी ‘हिंदु आतंकवाद’ शब्द वापरल्याचे आठवत नाही. याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये कुठेही आल्याचे वाचले नाही’, असे सांगितले. (धादांत खोटे बोलणार्या सुप्रिया सुळे ! – संपादक)
संपादकीय भूमिकाआता यावरून ‘शरद पवार यांचा मालेगाव बाँबस्फोट प्रकरणाशी संबंध नसेल कशावरून ?’, असा प्रश्न कुणाच्या मनात आल्यास चूक काय ? त्यामुळे आता सरकारने या दृष्टीनेही तपास करणे आवश्यक आहे, असेच जनतेला वाटते ! |
दक्षिण आफ्रिकेत १७ सहस्र हिंदूंनी एकत्र येऊन केले हनुमान चालिसाचे पठण !
अभिनेते आमिर खान यांच्या सावत्र भावावर त्याच्या पूर्व पत्नीकडून गंभीर आरोप !
Uttarakhand Ghar Wapsi : उत्तराखंडमध्ये थारू जमातीच्या ३६ कुटुंबांतील १०६ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश
गोहत्येच्या प्रकरणी ३ मुसलमानांना प्रत्येकी १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा
‘एस्.आय.आर्.’ प्रक्रिया करण्यार्या शिक्षकाला ३ धर्मांधांकडून मारहाण !
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे सखोल सर्वेक्षण करून उत्कृष्ट परिसंस्था निर्माण करा ! – मुख्यमंत्री