भारताने मे २०२५ मध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. भारतीय वायूसेनेने पाकिस्तानी ‘कमांड आणि कंट्रोल सेंटर्स’वर केलेल्या ‘को-ऑर्डिनेटेड हायप्रिसिशन’ (समन्वय करून उच्च अचूकतेने) आक्रमणांनी सैनिकी इमारती तर पाडल्याच, याखेरीज त्यांच्या कक्षेमध्ये येणारी प्रत्येक वस्तू, साहित्य, सैनिक इत्यादी पूर्णतः नष्ट केले. भारताने युद्धाचे सर्व तंत्रच एकदम पालटले. २२ एप्रिल २०२५ या दिवशी पहलगाममध्ये इस्लामी आतंकवाद्यांनी धर्म विचारून केलेल्या २६ निष्पाप हिंदूंच्या निर्घृण कत्तलीचा तो केवळ सूड नव्हता, तर त्याच्याही पुष्कळ पलीकडील काहीतरी होते. केवळ ८८ घंट्यांमध्ये घडवलेल्या आधुनिक राजकीय आणि सामरिक इतिहासाचा आढावा घेऊया. उपग्रहाद्वारे काढलेली छायाचित्रे प्रकाशित होण्याची प्रक्रिया चालू असल्याने आतापर्यंत त्या घटनेचे इतके सविस्तर विश्लेषण कुणी केलेले नव्हते. जागतिक सैनिकी इतिहासातील अद्वितीय घटना, म्हणजे ‘ऑपरेशन सिंदूर – मे २०२५’मध्ये भारतीय वायूसेनेच्या ‘को-ऑर्डिनेटेड हायप्रिसिशन’ आक्रमणांनी पाकिस्तानी ‘एअर डिफेन्स सिस्टम’ (हवाई संरक्षण यंत्रणा) नष्ट झाली. त्यामुळे जगातील अनेक देशांना जबरदस्त हादरेही बसले. असे काय घडले होते ?
१८ जून या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘भारतीय राजकीय नेतृत्वाकडून सैन्याला स्वायत्तता, भारतीय सैन्याने आक्रमणाचे अचूकतेने केलेले नियोजन आणि ‘भारतीय वायूसेनेने पाकच्या उद्ध्वस्त केलेल्या ‘कमांड अँड कंट्रोल सेंटर्स’ची माहितीच्या अंतर्गत ‘नूरखान विमानतळा’ची महिती वाचली. आज या लेखाचा पुढील भाग येथे देत आहोत.
लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/924790.html

४. भारतीय वायूसेनेने पाकच्या उद्ध्वस्त केलेल्या ‘कमांड अँड कंट्रोल सेंटर्स’ची माहिती

आ. मुरीद विमानतळ (चकवाल, जिल्हा पंजाब) : नियंत्रण रेषेपासून (‘लाईन ऑफ कंट्रोल’पासून) १५० कि.मी. अंतरावरील या तळावर पाकिस्तानी ड्रोन्स युद्धाचे मुख्यालय, ‘रेकॉनायझन्स’ आणि गुप्तचर यंत्रणेचे ‘कमांड आणि कंट्रोल सेंटर’ असून तेथे ‘अनमँड एअर व्हेईकल्स (यू.ए.व्ही.)’ आणि ‘अनमँड काँबॅट एअर व्हेईकल्स (यू.सी.ए.व्ही.)’ ठेवले होते. तुर्कीयेने दिलेले ‘GIDS Shahpar-1 UAVs, Bayraktar TB2 UCAVs’ (‘रिमोटली कंट्रोल्ड आणि ऑटॉनॉमस फ्लाईट ऑपरेशन्स’ची क्षमता असलेले), आणि ‘Baykar Bayraktar Akıncı HALE UCAVs’ यांची एकूण ४ स्क्वाड्रन्स या तळावर ठेवलेली होती, तसेच या तळावर ‘रडार सिम्युलेशन’ आणि संशोधन केंद्रही होते.
‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्राच्या व्यतिरिक्त या तळावरील आक्रमणासाठी भारतीय वायूसेनेने ‘स्काल्प ईजी’ ही लांब पल्ल्याची क्रूझ क्षेपणास्त्रे वापरली. या क्रूझ क्षेपणास्त्राचे वजन १३०० किलोग्रॅम आणि पल्ला ५५० कि.मी. असून ती आवाजाच्या वेगाने जातात. ‘गाईडन्स सिस्टम’साठी ती ‘इर्न्शियल’ (Inertial), ‘जी.पी.एस्.’ ‘टेरप्रोम’(TERPROM) प्रणाली वापरतात. उपग्रहांद्वारे काढलेली छायाचित्रे दाखवतात –

आ १. भूमीवरील इमारतींना झालेली मोठी हानी
आ २. धावपट्टीवर पडलेले मोठे खड्डे
आ ३. भूमीखालील ‘कमांड अँड कंट्रोल सेंटर’जवळ झालेला ३० मीटर आकाराचा मोठा खड्डा दाखवतो की, क्रूझ क्षेपणास्त्रांनी तळाच्या पोटात जाऊन स्फोट घडवलेले आहेत.

‘कमांड अँड कंट्रोल सेंटर’च्या प्रवेशद्वाराजवळ ८ मीटर लांबीचा आणि १० टन वजनाचा ‘रेस्क्यू’ (बचाव साहाय्य करणारा) ट्रक, अर्धा आत आणि अर्धा बाहेर असलेला दिसला. कैक दिवसांच्या उपग्रह छायाचित्रांत दिसलेली ‘रेस्क्यू’ (बचाव) प्रक्रिया बरेच काही सांगते. केवळ एकच रुग्णवाहिका आणि वाचलेली एकच व्यक्ती दिसते. खचलेल्या ‘कमांड अँड कंट्रोल सेंटर’च्या उद्ध्वस्त अवशेषांमधून केलेली ‘रेस्क्यू’ प्रक्रिया ८ घंटे चाललेली दिसली. त्यानंतर सिमेंट काँक्रीट ओतून मोठा खड्डा बुजवलेला दिसला.

भूमीखालील कंट्रोल सेंटरचा भारतीय आक्रमणामुळे झालेला नाश अवकाशातील उपग्रहांना दिसू नये; म्हणून केलेला केविलवाणा प्रयत्न; परंतु व्हायची ती हानी झालेली होती, एकेकाळाचे ‘कमांड अँड कंट्रोल सेंटर’ भूमीच्या उदरात गडप झाले होते. सैनिकी तळाला आणि विशेषतः पाकिस्तानी सैन्यदलांच्या मनोबलाला प्रचंड खिंडार पडले होते. पाकिस्तानी ड्रोन, ‘रेकॉनायझन्स’ आणि ‘इंटेलिजन्स ऑपरेशन’ संपुष्टात आले होते.

इ. भोलारी विमानतळ (कराची शहराच्या ईशान्येला असलेले पाकिस्तानी वायूसेनेचे प्रमुख तळ) : सप्टेंबर २०१७ मध्ये उद्घाटन केलेल्या आधुनिक पाकिस्तानी वायूतळांमधील ‘हिरा’ असलेल्या या तळावर पाकिस्तानी दक्षिणी वायू कमांडचे मुख्यालय आहे. चीन-पाकिस्तान आर्थिक (इकॉनॉमिक) कॉरिडॉरचे संरक्षण करण्याचे दायित्व या तळाकडे आहे. भारतीय वायूसेनेच्या ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्राने केलेल्या आक्रमणांमध्ये धावपट्टीची हानी केली, तसेच विमानांच्या प्रमुख हँगरच्या छताला ८० फुटांचे भलेमोठे भोक पाडून, तेथे ठेवलेली स्वीडिश SAAB-2000 Erieye AEI-AEW&C (एअरबोर्न इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर तथा कंट्रोल) विमाने, पाकिस्तानची ‘एअरबोर्न अर्ली-वॉर्निंग रडार’ तथा ‘जॅमिंग सिस्टम’ आणि अमेरिका अन् चीन यांच्याकडून पाकिस्तानला मिळालेली अनेक जेट विमाने नष्ट केली. ‘एअरबोर्न इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स सिस्टम’, म्हणजे रणांगणाचे डोळे असतात. त्यावाचून आधुनिक सेना अंध, बहिरी आणि एकटी असते. पाकिस्तानी ‘लाँग रेंज रडार सर्व्हिलन्स’ आणि ‘एअर डिफेन्स’चा कणा असलेली ही महत्त्वाची प्रणाली नष्ट झाल्याने पाकिस्तानी सेनेला जबरदस्त फटका बसला.
(क्रमश:)
– विंग कमांडर विनायक पु. डावरे (निवृत्त), पुणे (१२.६.२०२५)
लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/925650.html
टीप :
१. ‘कमांड अँड कंट्रोल सेंटर्स’, म्हणजे ‘निर्देश आणि नियंत्रण कक्ष’.
२. जागतिक क्षेत्रामध्ये केवळ सार्वजनिकरित्या आणि आंतरराष्ट्रीय उपग्रहांद्वारे उपलब्ध असलेली माहिती या लेखासाठी वापरली आहे.
Russian President Vladimir Putin : ‘ब्रिक्स’ जागतिक अर्थव्यवस्थेची नवीन महाशक्ती !
Parsi Woman In Morgue : मुसलमान व्यक्तीशी निकाह केलेल्या पारशी महिलेचा मृतदेह २ दिवस शवगृहात पडून !
Shamli Conversion : कोट्यधीश हिंदूच्या मुलाच्या धर्मांतराच्या प्रकरणात मुसलमान महिला व्यायाम प्रशिक्षक आणि तिचे वडील यांना अटक
Iran Israel War : इराण-इस्रायल यांच्यात पुन्हा उडाला युद्धाचा भडका !
जुने ते सोने !
‘कॉर्पोरेट’ (व्यावसायिक) नव्हे, धर्मांतर आणि बलात्कार यांचे केंद्र !