श्री. राहुल दिवाण हे उद्योजक, ‘एन्जल इन्व्हेस्टर’ (नवीन व्यावसायिकांना निधीचा पुरवठा करणारे), ‘ओपन-सोर्स सॉफ्टवेअर’चे प्रचारक, ‘सरयु फाऊंडेशन पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट’ आणि ‘सृजन टेक्नॉलॉजीस’ यांचे संस्थापक अन् मुख्याधिकारी आहेत. ‘सरयु फाऊंडेशन’ हे ‘एंटरप्राईझ वेब कंटेंट मॅनेजमेंट कन्सल्टिंग अँड डेव्हलपमेंट’चे आस्थापन आहे. त्याची नवी देहली, गुडगाव, गोवा, बेंगळुरू आणि सॅन फ्रान्सिस्को येथे कार्यालये आहेत. ‘सृजन टेक्नॉलॉजीस’ हे ‘ड्रुपल’चा मुख्य तंत्रज्ञान म्हणून वापर करते (‘ड्रुपल’ हे एक खुले प्लॅटफॉर्म असून त्याचा वापर संकेतस्थळे विकसित करण्यासाठी केला जातो.) आणि ‘ऑनलाईन’ व्यवसायांसाठी उत्पादने सिद्ध करते. श्री. दिवाण हे एक लेखक, ‘ब्लॉगर’ आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. वर्ष २०१६ मध्ये श्री. दिवाण यांनी ‘संगम टॉक्स’ हे ‘यू ट्यूब चॅनेल’ चालू केले. त्यांनी भारतीय सांस्कृतिक पुनरुज्जीवनाच्या कार्यासाठी जीवन समर्पित केले आहे. श्री. दिवाण यांनी दिलेली त्यांच्या कार्याची माहिती येथे दिली आहे.

विशेष सदर

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यासाठी मावळे आणि शिलेदार यांनी केलेला त्याग सर्वोच्च आहे, त्याप्रमाणे आजही अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी नागरिक धर्म-राष्ट्र यांच्या रक्षणासाठी ‘शिलेदार’ म्हणून कार्य करत आहेत. त्यांची आणि त्यांच्या हिंदु धर्मरक्षणाच्या संघर्षाची माहिती करून देणार्या ‘हिंदुत्वाचे शिलेदार’ या सदराद्वारे इतरांनाही प्रेरणा मिळेल. या उदाहरणांतून आपल्या मनातील चिंता दूर होऊन उत्साह निर्माण होईल ! – संपादक
१. हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्या पुनरुत्थानाच्या कार्याकडे कसे वळले ?
‘हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आणि राष्ट्रीयत्व हेच हिंदुत्व’, असे त्यांचे मत आहे. त्यांच्यासाठी हिंदुत्व आणि राष्ट्रवाद यांच्यात भेद नाही. दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
![]() |
![]() |
वर्ष २०१२ मध्ये त्यांच्याकडून श्री. संजीव संन्याल यांचे ‘द इंडियन रिनायसन्स’ आणि त्यानंतर श्री. मिशेल डॅनिनो यांचे ‘द लॉस्ट रिव्हर : ऑन द ट्रेल ऑफ द सरस्वती’ हे पुस्तक वाचण्यात आले. ही पुस्तके वाचल्यानंतर प्राचीन काळात भारतीय संस्कृती आणि सत्य इतिहास किती थोर आहे, हे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी हंपी, कंबोडिया अन् अंकोरवाट येथे भेट दिली आणि हिंदु संस्कृतीच्या भव्यतेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
२. राहुल दिवाण यांचा आध्यात्मिक प्रवास
श्री. राहुल दिवाण यांच्यात बालपणापासूनच आध्यात्मिक आणि धार्मिक गोष्टींमध्ये रुची होती. त्याला ध्यानधारणा आणि सखोल चिंतन यांची जोड मिळाली. त्यांनी अंतरात्म्याचा शोध घेण्यासाठी प्रत्येक श्वास, हालचाल आणि स्थिरतेचे क्षण यांच्याशी अनुसंधान साधले. श्री. दिवाण हे व्यावसायिक जगतातील एक प्रेरणादायी व्यक्तीमत्त्व आहेत. ज्या क्षेत्रात मानसिक स्वास्थ्यासाठी ध्यानसाधनेकडे दुर्लक्ष केले जाते, तेथे ते अंतर्मनाचा शोध घेण्यासाठी वर्षानुवर्षे ध्यानसाधना करत आहेत. श्री. दिवाण यांच्या जीवनात ध्यानसाधनेने आमूलाग्र परिवर्तन झाले. त्याचा त्यांचे मानसिक आरोग्य आणि व्यवसाय यांच्यावर सकारात्मक परिणाम झाला.

३. ‘सरयु फाऊंडेशन पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट’चे शैक्षणिक कार्य
‘सरयु फाऊंडेशन’ हे शिक्षण, भारतीय संस्कृती आणि सामुदायिक सक्षमीकरण यांसाठी कार्य करते. फाऊंडेशनच्या वतीने शाळा चालवल्या जातात. या शाळा मुलांना गणित, संगीत, इंग्रजी अन् योग शिकवतात. ओडिशातील २ गावांत २ शाळा चालू केल्या होत्या. देहलीतील ‘स्कूल ऑफ हॅप्पीनेस’ ही शाळा अद्यापही चालू आहे. त्याचा वंचित क्षेत्रातील १ सहस्रहून अधिक मुले लाभ घेत आहेत. अनौपचारिक शिक्षणाद्वारे अनेक मुलांच्या जीवनात सकारात्मक पालट घडवून आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ‘सरयु ट्रस्ट’ने ‘टॉय बँक’ची निर्मिती केली आहे. त्यातून विशेषतः गरीब मुलांना खेळणी पुरवली जातात. ‘सरयु ट्रस्ट’ हे संस्कृतीप्रधान राष्ट्राच्या उदयाची कल्पना करते, जे त्याच्या स्थानिक परंपरा, संस्कृती आणि मूल्ये यांचे संरक्षण, जतन अन् संवर्धन करते. ‘सरयु ट्रस्ट’ हे वनसंरक्षण, जलसंवर्धन, तसेच भारतीय संस्कृती आणि विचारसरणीचे पुनरुज्जीवन या क्षेत्रांतही सहभागी आहे.
| Demography Shifting in Bharat: The Imminent Threat And Its Solutions | Neeraj Atri | Rahul Dewan | |
४. ‘संगम टॉक्स’च्या माध्यमातून राष्ट्र, धर्म आणि संस्कृती यांविषयी जागृती
वर्ष २०१६ मध्ये श्री. दिवाण यांनी ‘संगम टॉक्स’ नावाचे ‘यू ट्यूब चॅनेल’चालू केले. त्यावर विशेषतः भारतीय संस्कृती, तत्त्वज्ञान आणि इतिहास यांवर संवाद साधला जातो. ‘संगम टॉक्स’ त्यांच्या वक्त्यांना विचार व्यक्त करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करते, तसेच भारतीय संस्कृतीच्या दृष्टीकोनातून विचार मांडते.
| Hinduism Needs to Become Missionary: Large Scale #GharWapsi | Rahul Dewan | #sangamtalks #gharwapsi
|
ही वाहिनी देशात रचली जाणारी खोटी कथानके खोडून काढण्याचे कार्य करते. गेल्या काही वर्षांत ‘संगम टॉक्स’ हे हिंदु धर्म आणि संस्कृती यांचे रक्षण, इतिहास, तत्त्वज्ञान, वारसा, भारतीय ज्ञान प्रणाली, विज्ञान, गणित, अर्थशास्त्र, कला, पर्यावरण आणि प्रवास इत्यादींसाठी एक मोठे व्यासपीठ बनले आहे.
| क़ुरान की आयतों का विस्तृत विश्लेषण | दारा शिकोह की राहुल दीवान संग वार्ता | #exmuslim #SangamTalks |
त्यांनी वरील विषयांच्या तज्ञांचे १ सहस्र ६०० हून अधिक वार्तालाप आयोजित केले आहेत. ‘संगम टॉक्स’ सध्या ६ भारतीय भाषांमध्ये चालते. यात मुख्यत्वे इंग्रजी आणि हिंदी या भाषांना सर्वाधिक प्राधान्य आहे.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या हस्ते राहुल दिवाण यांना ‘सनातन धर्मश्री’ पुरस्कार प्रदान !

नुकताच गोव्यातील फर्मागुडी येथे १७ ते १९ मे या कालावधीत सनातन संस्थेच्या वतीने ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ आयोजित करण्यात आला होता.
🏅Shri. Rahul Dewan (@RahulDewanV2), Founder of @SarayuTrust & curator of @SangamTalks, was conferred the prestigious #Sanatan_Dharmashri Award at Shankhnad Mahotsav 2025 by Sanatan Sanstha.
Through Sangam Talks, he has created a vibrant platform connecting youth with timeless… pic.twitter.com/g5LtkjmtAX
— Sanatan Sanstha (@SanatanSanstha) May 19, 2025
या कार्यक्रमात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या हस्ते श्री. राहुल दिवाण यांना ‘सनातन धर्मश्री’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
५. १ सहस्र कोटी रुपयांची ‘हिंदु फंड (निधी)’ योजना
श्री. राहुल दिवाण यांचे सद्गुरु जग्गी वासुदेव हे आध्यात्मिक गुरु आहेत. ते त्यांच्या मिळकतीतील काही टक्के भाग सद्गुरु यांच्या ‘ईशा फाऊंडेशन’च्या धार्मिक उपक्रमांसाठी अर्पण करतात. काळानुसार त्यांना हिंदु धर्माविषयी विविध समस्यांची माहिती मिळत गेली. भारतात काही हिंदुत्वनिष्ठ त्यांच्या स्तरावर किंवा संस्थांच्या माध्ममातून तळमळीने परिवर्तन आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या उपक्रमांसाठीही ‘सरयु फाऊंडेशन’च्या माध्यमातून दोन तृतीयांश धन दिले जाते. पूर्वी राजे महाराजे हे मंदिरांपासून गुरुकुलपर्यंत सर्वांना साहाय्य करायचे. ‘वैयक्तिक स्तरावर धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांना साहाय्य करण्यास मर्यादा आहेत. त्यामुळे ज्याप्रमाणे अन्य पंथियांचा त्यांच्या अनुयायांसाठी आर्थिक ‘फंड’ असतो, त्या स्तरावर हिंदु धर्माच्या कार्यासाठीही आर्थिक फंड असावा’, या उद्देशाने श्री. दिवाण अन् त्यांचे सहकारी यांचे १ सहस्र कोटी रुपयांचा ‘हिंदु फंड’ उभा करण्याचे ध्येय आहे.
६. वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवामध्ये सहभाग

गोव्यात वर्ष २०२३ मध्ये हिंदु जनजागृती समिती आयोजित वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवामध्ये श्री. राहुल दिवाण सहभागी झाले होते. या वेळी त्यांनी ‘हिंदूंनी साम्राज्यवादी बनून अखंड भारत बनवणे आणि वर्ष २०३० पर्यंत किमान १० कोटी हिंदु धर्मांतरितांना स्वधर्मात परत आणणे, ही ध्येये ठेवली पाहिजेत, तसेच ख्रिस्ती मिशनरी हिंदूंचे धर्मांतर करत असतील, तर हिंदूंनीही धर्मांतरित हिंदूंना स्वधर्मात परत आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात काम करावे’, असे सांगितले.
How to have Hindu Rajya by 2047? | Hindu Rashtra Adhiveshan | Rahul Dewan | #SangamTalks


Nagar Nigam Varanasi Decision : वाराणसीमध्ये आता मांस आणि मासे मिळणार नाहीत !
लक्षात घ्या, विज्ञानाची ही मर्यादा !
मंदिर संस्कृती : राष्ट्रनिर्मिती, अर्थव्यवस्था आणि समाजउन्नती यांचे केंद्र !
मंदिरे : राष्ट्ररचनेचे मजबूत आधारस्तंभ !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
ताजमहालच्या खाली दडवण्यात आलेले सत्य !