Partition Of India : फाळणीनंतर केवळ ७२ लाख मुसलमान भारतातून पाकिस्तानात गेले !

अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांची माहिती

नवी देहली : १५ ऑगस्ट १९४७ पर्यंत भारतात ४ कोटी २५ लाख मुसलमान होते; परंतु फाळणीनंतर केवळ ७२ लाख मुसलमान पाकिस्तानात गेले. पंजाब प्रांतातील ५५ लाख, बंगाल, बिहार आणि ओडिशा येथील केवळ ७ लाख, उत्तरप्रदेश आणि देहली येथील ४ लाख ६५ सहस्र, राजस्थानमधील २ लाख ३५ सहस्र, महाराष्ट्र आणि गुजरात येथील केवळ १ लाख ६० सहस्र, भोपाळ आणि हैदराबाद येथील केवळ ९५ सहस्र, तर तमिळनाडू, केरळ आणि कर्नाटक येथील केवळ १८ सहस्र मुसलमान पाकिस्तानला गेले.

अधिवक्ता विष्णु शंकर जैन

फाळणीद्वारे दोन्ही देशांवर कब्जा करणारे धूर्त मुसलमान !

१. वर्ष १९४५-१९४६ ची निवडणूक देशाची फाळणी होईल कि एकसंघ राष्ट्र राहील या सूत्रावर लढवली गेली.

२. मुसलमानांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या ४९२ जागांपैकी ४२५ जागा मुस्लिम लीगने जिंकल्या

३. उत्तरप्रदेशातील मुसलमानांसाठी राखीव असणार्‍या ६६ जागांपैकी ५४ जागा, मुंबई प्रांतातील ३० जागांपैकी ३० जागा, बिहारमधील ४० जागांपैकी ३४ जागा, पंजाबमधील ८६ जागांपैकी ७३ जागा मुस्लिम लीगने जिंकल्या.

४. मध्यप्रदेशातील मुसलमानांसाठी राखीव असणार्‍या १४ जागांपैकी १३ जागा, बंगालमधील ११९ जागांपैकी ११३ जागा, मद्रास प्रांतातील २९ जागांपैकी २९ जागा मुस्लिम लीगने जिंकल्या.

– अधिवक्ता विष्णु शंकर जैन

(यावरून भारतातील सर्वच मुसलमानांनी पाकिस्तानची मागणी केली होती; मात्र प्रत्यक्षात फाळणीनंतर भारतातील मुसलमानांनी भारतातच रहाण्याचा धूर्त निर्णय घेतला आणि दोन्ही देशांवर नियंत्रण मिळवले !)