Sharmishtha Panoli Case : पुणे येथे शिकणारी विद्यार्थी शर्मिष्ठा पनोली हिला न्यायालयाने जामीन नाकारला !

  • ‘आपरेशन सिंदूर’वरून भारतावर टीका करणार्‍या पाकिस्तानी महिलेला प्रत्युत्तर देतांना मुसलमानांविषयी कथित आक्षेपार्ह विधान केल्याचे प्रकरण

  • १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

शर्मिष्ठा पनोली

कोलकाता (बंगाल) – ‘ऑपरेशन सिंदूर’वरील पोस्टला उत्तर देतांना मुसलमानांच्या विरोधात कथित आक्षेपार्ह टिपणी केल्याच्या आरोपावरून कोलकाता पोलिसांनी शर्मिष्ठा पनोली या विद्यार्थिनीला हरियाणातील गुरुग्राम येथून अटक केली. तिला कोलकातामधल्या अलीपूर न्यायालयात उपस्थित करण्यात आले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. शर्मिष्ठा पुणे येथे कायद्याचे शिक्षण घेत आहे.

आम्ही आता महात्मा गांधी यांचे भक्त नाही !

शर्मिष्ठाने तिच्या इन्स्टाग्राम खात्यावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये तिने एका पाकिस्तानी महिलेला उत्तर देतांना महंमद पैगंबर यांच्यावर कथित टीका केली. पाकिस्तानी महिलेला उद्देशून तिने म्हटले की, पहलगाम येथील आक्रमण आणि तुमचा देश ज्या इतर आतंकवाद्यांना पाठिंबा देत आहे, त्यांच्याबद्दल तुम्ही ऐकले आहे का ? त्याला आम्ही प्रत्युत्तर देऊ नये का ? आम्ही आता महात्मा गांधी यांचे भक्त नाही !

या व्हिडिओवरून शर्मिष्ठा यांच्या विरोधात तक्रार करण्यात आली होती. यानंतर तिने हा व्हिडिओ खात्यावरून हटवला होता. तसेच क्षमाही मागितली होती. आणखी एका व्हिडिओमध्ये तिने हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि यू ट्यूब चॅनल चालवणारा रणवीर अलाहबादिया यांच्यावरही जोरदार टीका केली आहे. या दोघांनी पहलगाम येथील आक्रमणानंतर पाकविरोधात सौम्य भूमिका घेतली होती. याला तिने ‘ढोंगीपणा’ म्हटले होते.

पाकमधून देण्यात आल्या होत्या ठार मारण्याच्या धमक्या

शर्मिष्ठा हिने व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर तिला पाकमधून ‘सर तन से जुदा’च्या (शिर धडापासून वेगळे करण्याच्या) धमक्या देण्यात आल्या होत्या. तसेच तिच्यावर गुन्हा नोंदवण्याची मागणी करण्यात येत होती.

संपादकीय भूमिका

पाकिस्तानी महिलेला प्रत्युत्तर दिल्यावरून एका विद्यार्थिनीला अटक करणारे कोलकाता पोलीस भारताचे कि पाकिस्तानचे ? ममता बॅनर्जी यांचे सरकार पाकप्रेमीच नाही, तर पाकिस्तानी झाल्याचेच हे दर्शक आहे. आतातरी केंद्र सरकार ममता बॅनर्जी यांचे सरकार विसर्जित करणार आहे का ?