भारतविरोधी संदेशांचाही समावेश !

मुंबई – भारतीय सैनिकांनी पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या विरोधात सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात संदेश प्रसारित करण्यात येत आहेत. महाराष्ट्राच्या सायबर पोलिसांनी आतापर्यंत याविषयीचे ५ सहस्रांहून अधिक संदेश विविध सामाजिक माध्यमांवरून हटवले आहेत; मात्र अद्यापही अनेक संदेश सामाजिक माध्यमांवर आहेत आणि मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत. यामध्ये काही भारतविरोधी संदेशांचाही समावेश आहे. संदेश ज्या खात्यांवरून पाठवले जात आहेत, त्यांतील बहुतांश खात्यांची नावे इस्लामी आहेत. त्यामुळे यामागे भारतातील धर्मांध मुसलमानांचा सहभाग असल्याची शक्यता आहे. ज्या खात्यांवरून असे संदेश पाठवले जात आहेत, त्यांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहेत.
१. ‘ऑपरेशन सिंदूर’विषयी अफवा पसरवणारे आणि भारतविरोधी संदेश काढून टाकण्याचे काम महाराष्ट्र सायबर पोलिसांकडून युद्धपातळीवर चालू आहे. यांतील काही संदेश सैन्याच्या हालचाली, रणनीती यांविषयी अफवा पसरवणारे आहेत.
२. बहुतांश संदेश हे भारतीय सैनिकांच्या कारवाया मुसलमानविरोधी असल्याच्या अफवा पसरवणारे आहेत. यासाठी काही जुने आणि चुकीचे व्हिडिओ सामाजिक माध्यमांवरून प्रसारित केले जात आहेत.
३. या प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी नागपूर येथील एका हॉटेलमधून रेजाज एम्. शिबा सिदीक (वय २६ वर्षे) नावाच्या एका कथित मुक्त पत्रकाराला अटक केली. रेजाज हा मूळचा केरळमधील रहाणारा असून ‘मकतूब मिडिया’ या ‘न्यूज वेबसाईट’वर लिखाण करत असल्याचे आढळून आले आहे.

४. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर त्याने संकेतस्थळावर भारतीय सैनिकांविषयी आक्षेपार्ह लिखाण केले होते. यापूर्वी केंद्र सरकारकडून नक्षलवादाविरोधात केलेल्या कारवायांविषयी त्याने आक्षेपार्ह लिखाण केल्याचे आढळून आले आहे.
५. महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्येही सामाजिक माध्यमांवरून ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि भारतीय सैनिक यांच्याविषयी अफवा पसरवणारे लिखाण प्रसारित केले जात आहे. ‘यु ट्यूब’, ‘इंस्टाग्राम’, ‘एक्स’ आदी सामाजिक माध्यमांवरून अशा प्रकारचे संदेश प्रसारित केले जात आहेत.
संपादकीय भूमिकादेश युद्धजन्य आपत्कालातून जात असतांना अशा अंतर्गत बंडाळी माजवणार्या अशा घरभेद्यांना वेळीच शिक्षा झाली, तर देश आगामी संकटातून वाचेल ! |
Temple Land Protection Movement : ‘देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ला स्थगिती !
Bhangar Blast : बंगालमधील भांगर बाँबस्फोट प्रकरणी तृणमूल काँग्रेसचा माजी आमदार शौकत मोल्ला यास अटक
नेरूळ (नवी मुंबई) येथील रुग्णालयाच्या वसतीगृहातील हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती धर्मांध ख्रिस्ती युवतीने फेकून दिल्या !
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
नागपूर येथे श्री दुर्गादेवीच्या मूर्तीवरील सोन्याची साखळी चोरणार्या ३ धर्मांधांना अटक !