Karnataka Muslim Pharmacist Arrested : महिलांची फसवणूक करून लैंगिक अत्याचार करणार्‍या मेडिकल स्टोअरचा मालक अमजद याला अटक

दावणगेरे (कर्नाटक) येथील घटना

आरोपी अमजद

दावणगेरे (कर्नाटक) – औषधे घेण्यासाठी आलेल्या महिला, युवती आणि मुली यांना फसवून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करून त्या कृत्यांचे व्हिडिओ बनवणार्‍या अमजद नावाच्या मेडिकल स्टोअरच्या मालकाला पोलिसांनी अटक केली आहे.

ही घटना दावणगेरे जिल्ह्यातील चन्नगिरी येथे घडली. दुकानात आलेल्या महिलांना तो जाळ्यात अडकवत असे. त्यांच्यावर अत्याचार करून त्याचे भ्रमणभाषमध्ये रेकॉर्डिंग करत होता. त्यानंतर हे व्हिडिओ लॅपटॉपमध्ये संरक्षित करून तो पहात असे. पोलिसांनी त्याच्या भ्रमणभाषची तपासणी केली असता त्यात ६० हून अधिक अश्‍लील व्हिडिओ आढळले.

संपादकीय भूमिका

अशांना शरीयत कायद्यानुसार हात-पाय तोडण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !