वक्फ सुधारणा विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीत गदारोळ !

नवी देहली : येथे वक्फ सुधारणा विधेयकावर संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीमध्ये झालेल्या गदारोळामुळे बैठकीचे कामकाज काही काळासाठी स्थगित करावे लागले. यानंतर विरोधी पक्षाच्या १० खासदारांना बैठकीतून दिवसभरासाठी निलंबित करण्यात आले. विधेयकात प्रस्तावित केलेल्या पालटांवर संशोधन करण्यासाठी पुरेसा वेळ दिला जात नसल्याचा दावा विरोधी सदस्यांनी केला होता. देहलीच्या विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून वक्फ सुधारणा विधेयकाचा अहवाल लवकरात लवकर संसदेत मांडण्याचा भाजप आग्रह धरत असल्याचा आरोपही या वेळी विरोधकांनी केला.
१. लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथे झालेल्या बैठकीनंतर समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी सांगितले होते की, समितीची शेवटची बैठक २४ जानेवारीला होणार आहे. त्यानंतर ३१ जानेवारी या दिवशी होणार्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा अहवाल संसदेत मांडला जाईल.
२. समितीतील सदस्य तृणमूल खासदार कल्याण बॅनर्जी म्हणाले की, समितीची कार्यवाही एक तमाशा बनली आहे. २७ जानेवारीला होणारी बैठक ३० जानेवारी किंवा ३१ जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली; मात्र भाजपचे सदस्य निशिकांत दुबे यांनी विरोधी सदस्यांवर टीका करत त्यांचे हे वर्तन संसदीय परंपरेच्या विरोधात असून ते बहुमताचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले.
संपादकीय भूमिका‘खासदारांना शिस्त नसते’, अशीच प्रतिमा देशातील नागरिकांच्या समोर निर्माण झालेली आहे. अशा बेशिस्तांना शिस्त लावण्यासाठी कठोर शिक्षा करणे आवश्यक ठरते ! |
प्रस्तावित ‘देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियमा’विषयी देवस्थानांच्या शासनाकडून अपेक्षा !
वाशी येथे गोमांस विक्रीच्या प्रकरणी मुसलमानावर गुन्हा नोंद !
बांगलादेश सरकार ‘हिंदूमुक्त’ राष्ट्र बनवू पहाणार्यांना साहाय्य करत आहे का ? – Salah Uddin Shoaib Choudhury
उत्तरप्रदेशात वादळी वार्यासह पाऊस : ५ जणांचा मृत्यू
सशस्त्र मुसलमानांच्या जमावाने भाजप नेत्याची हातोड्याने केली हत्या !
१०० टक्के इथेनॉलमिश्रित इंधनाला कायदेशीर मान्यता !