१. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या प्रीतीचे मूर्तीमंत स्वरूप असून त्यांच्या सहवासात साधकांना स्वभावदोषांमुळे होणारे त्रास क्षणांत नाहीसे होणे
‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या प्रीतीचे मूर्तीमंत स्वरूप आहेत. क्षणभर जरी त्यांचे स्मरण केले, तरी साधकांना शांत आणि हलके वाटते. एरव्ही आपल्यातील ‘स्वप्रतिमा जपणे, मन साशंक असणे, नकारात्मक विचार करणे, भूतकाळातील प्रसंग आठवणे आणि ताण घेणे’, या स्वभावदोषांमुळे आपल्याला त्रास होत असतो. श्रीचित्शक्ति काकूंच्या सहवासात तो त्रास क्षणांत नाहीसा होतो.
२. ‘श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांचे हावभाव, डोळे, स्मित आणि त्यांचे चालणे पाहून जणू सत्ययुगातील ऋषींना पहात आहे’, असे वाटणे
मी साधनेत नवखी असतांना रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात जात असे. तेव्हा माझी आणि श्रीचित्शक्ति काकूंची ओळख नव्हती; मात्र त्यांच्याविषयी मी सहसाधकांकडून ऐकले होते. त्याचप्रमाणे मी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये छापून आलेले त्यांच्याविषयीचे लेख वाचले होते. प्रत्येक वेळी त्यांना पाहिल्यावर मला रामायण आणि महाभारत यांतील कथांमध्ये असलेले ऋषीमुनी अन् ऋषीपत्नी यांची आठवण होत असे. ‘श्रीचित्शक्ति काकूंचे हावभाव, डोळे, स्मित आणि त्यांचे चालणे पाहून मी जणू सत्ययुगातील ऋषींना पहात आहे’, असे मला वाटत असे. त्या वेळी माझ्या मनात आलेले विचार आता सत्य ठरले आहेत.
३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेनेच साधकांना श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यासारखे संतरत्न लाभले !
माझे परमभाग्य आहे की, मला श्रीचित्शक्ति काकूंचा सहवास मिळाला. त्यासाठी मी त्यांच्या चरणकमली कृतज्ञतापूर्वक वंदन करते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेनेच साधकांना श्रीचित्शक्ति गाडगीळ यांच्यासारखे संतरत्न लाभले आहे. यासाठी मी गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते. श्रीचित्शक्ति काकूंच्या चरणांची धूळ होण्याचीही पात्रता नसतांना मला त्यांचा सहवास आणि मार्गदर्शन लाभले, तसेच त्यांच्या प्रीतीच्या वर्षावात मला भिजता आले.
४. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या वाढदिवसानिमित्त केलेली प्रार्थना !
‘श्रीचित्शक्ति काकूंच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यासाठी ईश्वराकडे काय प्रार्थना करावी ?’, असा विचार करत असतांना माझ्या मनात पुढील विचार आले, ‘श्रीचित्शक्ति काकू, मी तुमच्यासाठी ईश्वराकडे कोणती प्रार्थना करू ? तुम्ही आणि ईश्वर एकच आहात. त्यामुळे ‘तुमची प्रीती आणि कृपा प्राप्त होण्यासाठी मला पात्र होता येऊ दे’, हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे !’
– सौ. आनंदिता दासगुप्ता, कोलकाता, बंगाल. (१.१२.२०२४)