संभल (उत्तरप्रदेश) – २४ नोव्हेंबर या दिवशी उत्तरप्रदेशातील संभल जिल्ह्यातील जामा मशिदीच्या सर्वेक्षणाच्या वेळी आक्रमणकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली, तसेच गोळीबारही केला होता. आरोपींकडे पाकिस्तान आणि अमेरिका येथे बनवलेली स्फोटके होती. घटनास्थळी पोलिसांना पाच खोके आणि काडतुसे सापडल्याने ही माहिती पुढे आली आहे.
पोलीस अधीक्षक कृष्णकुमार बिश्नोई यांनी सांगितले की, आक्रमणकर्त्यांनी सर्वेक्षण पथक जामा मशिदीत पोचण्यापूर्वी ‘सीसीटीव्ही कॅमेरे’फोडले होते. हिंसाचाराच्या वेळी आक्रमणकर्त्यांनी वापरलेली शस्त्रेही लवकरच जप्त केली जातील. या प्रकरणाच्या चौकशीसाठी वेगवेगळ्या पथकांची स्थापना करण्यात आली आहे. लवकरच दोषींची ओळख पटवली जाईल.
संपादकीय भूमिकायाचा अर्थ भारतात धर्मांधांकडून घडवण्यात येणार्या दंगली आणि हिंसाचार यांचा पाकिस्तान आणि अमेरिका यांच्याकडून पुरस्कार केला जातो, असाच आहे. याविषयी सरकार काय पावले उचलणार ? |