उर्मट आणि उद्धट बांगलादेशाच्या उलट्या बोंबा !
ढाका (बांगलादेश) – बांगलादेशात ऑगस्टमध्ये शेख हसीना यांचे सरकार पाडण्यात आल्यापासून हिंदूंवर आक्रमणे होत आहेत. त्यांची मंदिरे, घरे यांना लक्ष्य केले जात आहे. हे अद्याप थांबलेले नाही. यावर भारताने हिंदूंचे रक्षण करण्याचे बांगलादेशाच्या सरकारला आवाहन केल्यानंतर सरकारकडून भारताला उलट उत्तर देण्यात आले आहे. बांगलादेशाच्या अंतरिम सरकारचे कायदेशीर गोष्टींचे सल्लागार आसिफ नजरूल यांनी फेसबुकवरील एका पोस्टमध्ये म्हटले की, अल्पसंख्य मुसलमान समाजावर अत्याचारांच्या अगणित घटना भारतात घडत रहातात; पण त्यांना कसलाही पश्चाताप किंवा लाज नाही. भारताचा हा दुटप्पीपणा निंदनीय आणि आक्षेपार्ह आहे. बहुतेक बांगलादेशींना असा विश्वास आहे की, हे अंतरिम सरकार पूर्वीच्या अवामी लीग सरकारइतकेच चांगले असेल. ते देशातील अल्पसंख्य समुदायांना अधिक चांगली सुरक्षा प्रदान करण्यास सक्षम आहे.
दुसरीकडे बांगलादेशाच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार महंमद युनूस यांचे प्रसिद्धमाध्यम सचिव शफीकुल इस्लाम यांनी म्हटले की, बांगलादेशामध्ये हिंदू सुरक्षित आहेत. तसेच इस्कॉनवर बंदी घालण्याचा कोणताही हेतू नाही. सरकार प्रत्येक समुदायाच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहा. अल्पसंख्यांकांच्या संरक्षणाविषयी भारत दुटप्पी मापदंड अवलंबत आहे. चिन्मय प्रभु यांना निष्पक्षपणे बाजू मांडण्यासाठी संधी मिळेल. बांगलादेशामध्ये हिंदु सुरक्षित आहेत. अफवांवर लक्ष देऊ नका.
संपादकीय भूमिका
|