संकल्‍पाने धर्मसंस्‍थापनेचे कार्य करवून घेणारे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

‘गणेशोत्‍सव, दिवाळी इत्‍यादी सण आणि उत्‍सव यांच्‍या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमातील बरेच साधक घरी जातात. ‘साधक संख्‍या अल्‍प असतांनाही आश्रमातील सेवा कशा काय पूर्ण होतात ?’, याविषयी माझ्‍या मनात प्रश्‍न निर्माण होत होते. एक दिवस मला एक लहानशी ३० मिनिटांची आश्रमातील सेवा मिळाली. त्‍या वेळी मला शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.

सौ. सुजाता रेणके

१. आश्रमातील सेवांची व्‍याप्‍ती मोठी आहे. साधक संख्‍या न्‍यून होऊनही कोणतीही सेवा थांबत नाही. सर्व सेवा वेळेवरच होतात, उदा. सर्व साधकांसाठी प्रसाद आणि महाप्रसाद बनवणे, रुग्‍ण साधकांची सेवा इत्‍यादी.

२. एखादी सेवा करण्‍यास कुणी साधक नसले, तरी ती सेवा अन्‍य साधकांपैकी कुणी तरी करतात.

३. देवाचे कार्य कुठेच थांबत नाही. ते ठरलेल्‍या वेळेत होणारच असते. तसेच  गुरुकार्य सहज होऊन जाते.

४. साधक संख्‍या अल्‍प असतांना उपलब्‍ध साधकांना अधिक सेवा कराव्‍या लागतात, तरीही ते साधक आनंदी दिसतात. त्‍या वेळी देवच त्‍यांची सेवा करण्‍याची क्षमता, शक्‍ती, तळमळ आणि भाव वाढवून त्‍यांना त्‍या सेवांचे फळही देतो.

५. ‘आश्रमातील सेवांच्‍या उदाहरणावरून ‘गुरुदेवांचे कार्य सर्वत्र कसे चालले आहे ? धर्मसंस्‍थापना करणार्‍या संस्‍थेला कितीही अडचणी आल्‍या, तरी ठरलेल्‍या सेवा आणि कार्य होतच रहाते. सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या संकल्‍पाने सनातनचे साधकच नव्‍हे, तर धर्माभिमानी, हिंदुत्‍वनिष्‍ठ इत्‍यादी अनेक जण धर्मसंस्‍थापनेच्‍या कार्यात सहभागी होत आहेत’, हे माझ्‍या लक्षात आहे.

‘धर्मप्रसाराचे सर्व कार्य केवळ गुरुदेवांच्‍या संकल्‍पाने होत आहे’, हे लक्षात येऊन मला गुरुदेवांची आठवण आली आणि माझा भाव पुष्‍कळ जागृत झाला अन् त्‍यांच्‍या चरणी कृतज्ञता व्‍यक्‍त झाली.’

– सौ. सुजाता अशोक रेणके (वय ६२ वर्षे), फोंडा, गोवा. (११.९.२०२४)