कोल्हापूर – विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने कोल्हापूर येथील राजकीय प्रचाराच्या जाहीर सभेत भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी महिलांविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. या विधानामुळे न्यायसंहिता – २०२३ चे कलम १७९ अन्वये आदर्श आचारसंहितेचे उल्लघंन केल्याचे निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आले. त्यामुळे तात्काळ खुलासा करण्याची नोटीस निवडणूक निर्णय अधिकारी यांनी धनंजय महाडिक यांना दिली होती. याविषयी धनंजय महाडिक यांनी स्पष्टीकरण सादर केले. हे स्पष्टीकरण अमान्य करत धनंजय महाडिक यांच्यावर भारतीय न्याय संहिता बी.एन्.एन्.एस्. २०२३ अंतर्गत १७१ (२) (र) अंतर्गत जुना राजवाडा कोल्हापूर येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
धनंजय महाडिक यांचे वक्तव्य !
लाडकी बहीण योजनेचे पैसे घेणार्या महिला, जर काँग्रेसच्या रॅलीत अथवा सभेत दिसल्या, तर त्यांचे छायाचित्र काढा. ते छायाचित्र आम्हाला पाठवा, म्हणजे आम्ही त्यांची व्यवस्था करू !