मुंबई – कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो ३ मार्गिकेवरील मेट्रो गाडी भुयारातच बंद पडली. ती गाडी बीकेसीच्या दिशेने जात होती; पण तांत्रिक बिघाड झाल्याने ती बंद पडून प्रवासी गाडीतच अडकले. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी तांत्रिक बिघाड दूर करून गाडी नजीकच्या टी १ मेट्रो स्थानकावर आणली. त्यानंतर प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. या वेळी आरे ते बीकेसी मेट्रो सेवा २० मिनिटे विस्कळीत झाली होती.