‘एकदा रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात एक शिबिर झाले. त्या शिबिरात उपस्थित रहाण्यासाठी मी रामनाथी आश्रमात आल्यावर मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. मी स्वागतकक्षातील श्रीकृष्णाच्या चित्राकडे पहात असतांना मला सूक्ष्मातून दिसले, ‘श्रीकृष्णाच्या हातातील सुदर्शनचक्र गतीमान झाले आहे. त्या सुदर्शनचक्रातून निळसर रंगाचा प्रकाशाचा झोत वेगाने सर्वदूर जात आहे.’
२. मला वाटले, ‘श्रीकृष्णाचे हे रूप भक्तांसाठी तारक रूप आहे आणि हेच रूप भक्तांचे रक्षण करणार आहे.’
माझ्याकडून श्रीकृष्णाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त झाली.’
– श्री. प्रसाद कुलकर्णी, मलकापूर, कोल्हापूर. (६.७.२०२४)
|