सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी साधिकेला स्वप्नात केलेल्या मार्गदर्शनानुसार तिने नामजप केल्यानंतर तिला होणारे आध्यात्मिक त्रास दूर होणे

‘रामनगर, बेळगाव येथील कु. श्रद्धा नागेंद्र गावडे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्यानंतर तिला आध्यात्मिक त्रास झाले. तिला स्वप्नात सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांचे दर्शन झाले. त्यांनी सांगितलेला नामजप केल्यावर तिला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ
कु. श्रद्धा गावडे

‘१९.४.२०२४ या दिवशी मी रामनाथी आश्रमात गेले होते. तेव्हा रात्री मला झोप येत नव्हती. नंतर मला झोपेत भीतीदायक स्वप्ने पडत होती. नंतर २ – ३ दिवसांनी रात्री झोपतांना माझ्या मनात विचार आला, ‘उद्या सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना भेटून त्यांना मला होणार्‍या त्रासांवर नामजप विचारूया.’ मी रात्री झोपण्यापूर्वी पू. शंकर गुंजेकर (सनातनचे ५६ वे संत, वय ६१ वर्षे) यांनी दिलेली विभूती खोलीमध्ये फुंकरली आणि झोपले.

तेव्हा रात्री मला स्वप्नात दिसले, ‘सद्गुरु गाडगीळकाका आले आहेत. मी त्यांना मला होणारे आध्यात्मिक त्रास सांगितले. त्यांनी मला ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप अर्धा ते एक घंटा करण्यास सांगितला.’

त्यांनी मला स्वप्नात सांगितल्यानुसार मी दुसर्‍या दिवसापासून हा नामजप करू लागले. तेव्हा त्याच दिवसापासून मला चांगली झोप येऊ लागली.

केवळ सद्गुरु गाडगीळकाकांनी स्वप्नात सांगितलेला नामजप केल्यामुळे माझे त्रास दूर झाले. त्याबद्दल प.पू. गुरुदेव आणि सद्गुरु गाडगीळकाका यांच्या चरणी मी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– कु. श्रद्धा नागेंद्र गावडे (वय १८ वर्षे), रामनगर, जिल्हा बेळगाव. (३१.५.२०२४)

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक