‘कलेच्या माध्यमातून ईश्वरप्राप्ती करणे’ ही संकल्पना सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी मांडली आहे. या दृष्टीकोनातून समाजाची सात्त्विकता वाढवणारी आणि समाजाला आवश्यक असलेली कलाकृती सिद्ध करण्याचे कार्य चालू आहे. या सात्त्विक कलाकृती सिद्ध करण्याची सुवर्णसंधी कलेच्या क्षेत्रात कार्य करणार्या, तसेच करू इच्छिणार्यांकरता निर्माण झाली आहे. ग्रंथांची मुखचित्रे, पंचांग, फलक, हस्तपत्रके, ‘सीडी कव्हर’, छायाचित्रांचे संच तयार करणे, सूक्ष्म-चित्रे, बोधचित्रे, विज्ञापने आदी सेवा उपलब्ध आहेत. या सेवांमध्ये आपणही सहभागी होऊ इच्छित असल्यास स्वत:ची माहिती जिल्हासेवकांच्या माध्यमातून कळवा ! या सेवेसाठी आपल्याला ‘कोरल ड्रॉ’ आणि ‘फोटोशॉप’ या संगणकीय प्रणालींचे ज्ञान असल्यास आपल्याला प्राधान्य देण्यात येईल. ज्यांची या प्रणाली शिकून घेऊन सेवा करायची इच्छा असेल, त्यांनाही या संधीचा लाभ घेता येईल !
चला, समाजाची सात्त्विकता वाढवण्याच्या या राष्ट्र आणि धर्म कार्यात योगदान देऊन धर्मसेवेचा आनंद लुटूया !
संपर्क
सौ. भाग्यश्री सावंत
संपर्क क्रमांक : ७०५८८८५६१०
इ-मेल : [email protected]