‘श्रीकृष्ण जन्माष्टमीविषयी’ ध्वनीप्रक्षेपकावर भक्तीसत्संग चालू असतांना देवद आश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर भक्तीसत्संग ऐकण्यासाठी २ गायी येणे

आज २८ ऑक्टोबर या दिवशी ‘वसुबारस’ आहे त्या निमित्ताने…

‘२२.८.२०२४ या दिवशी म्हणजे गुरुवारी दुपारी सनातनच्या देवद (पनवेल) येथील आश्रमात ‘श्रीकृष्ण जन्माष्टमी’ या विषयावर ध्वनीप्रक्षेपकावर भक्तीसत्संग लावला होता. दुपारी ४ वाजता आश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर एक गाय येऊन उभी राहिली. तेव्हा एक भक्तीगीत चालू होते. ती गाय ५ मिनिटे तिथे शांतपणे उभी राहिली. तेव्हा मला शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

भक्तीसत्संग ऐकणारी गाय 

१. गाय भक्तीगीत ऐकत शांतपणे उभी होती. मी तिच्या डोक्याला हात लावून नमस्कार केला आणि तिला गोंजारले.

श्री. दीपक गोडसे

२. आरंभी प्रवेशद्वारासमोर एकच गाय उभी होती. तिला पाहून दुसरी गायही प्रवेशद्वारासमोर येऊन उभी राहिली. मी प्रवेशद्वार उघडले. तेव्हा दोन्ही गायी आतमध्ये येऊ लागल्या. तेव्हा ‘त्यांनाही भक्तीसत्संगाचे आणि श्रीकृष्णाचे चैतन्य अनुभवाचे होते’, असे मला वाटले.

३. त्या गायींच्या डोळ्यांमध्ये निरागसता आणि भाव असून त्यांच्यात चैतन्य जाणवत होते.

४. ‘गायींच्या माध्यमातून साक्षात् भगवान श्रीकृष्णच दर्शन देण्यासाठी आले आहेत’, असे मला जाणवले.

भक्तीसत्संगाच्या माध्यमातून श्रीकृष्णानेच मला ही अनुभूती दिली. त्याबद्दल ‘भगवान श्रीकृष्ण आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. दीपक गोडसे (वय २४ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२३.८.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक