१. पंचकर्म चिकित्सा करतांना साधिकेला सर्वांकडून प्रेमभाव अनुभवायला मिळणे आणि ‘समोरच्या व्यक्तीमध्ये प्रेमभाव पहाता येणे महत्त्वाचे आहे’, असे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी सांगणे
कु. रोशेल नाथन : मी आश्रमात आयुर्वेदीय वैद्यांच्या मार्गदर्शनानुसार संत आणि साधक यांच्यावर पंचकर्म चिकित्सा करते. ही सेवा करणार्या आम्हा साधकांना ‘केवळ संतांकडूनच प्रेमभाव अनुभवता येतो’, असे नाही, तर उपचार करून घेण्यासाठी येणार्या प्रत्येक साधकाकडून प्रेमभाव अनुभवायला मिळतो. हे या सेवेचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे आम्हाला पुष्कळ कृतज्ञता वाटते.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (सर्वांना उद्देशून) : ‘समोरच्या व्यक्तीमध्ये नेहमीच प्रेमभाव पहाता येणे’, हे अतिशय महत्त्वाचे आहे.
२. साधिकेने साधनेला आरंभ केल्यावर नातेवाइकांकडून तिच्या साधनेला असलेला विरोध गुरुकृपेमुळे मावळणे
कु. रोशेल नाथन : मी वर्ष २०१० पासून साधना करायला आरंभ केला. त्या वेळी मला माझ्या नातेवाइकांकडून साधना करण्यास विरोध होत होता. याचे कारण म्हणजे माझा जन्म आणि पालनपोषण निराळ्या संस्कृतीत झाले आहे. वर्ष २०१७ मध्ये मी साधना करण्याचा निर्णय घेतला. तेव्हाही मला माझ्या नातेवाइकांकडून विरोध झाला; मात्र मी साधना करू लागले आणि त्यांचा विरोध हळूहळू मावळला. ‘मी साधना करत आहे’, हे त्यांनी आता स्वीकारले आहे. केवळ गुरुकृपेमुळे हे शक्य झाले आहे.’
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |