१. श्री. कृष्णा भिकाजी पंडित (अध्यक्ष, श्री शारदादेवी मंदिर चॅरिटी ट्रस्ट), तुरंबव, रत्नागिरी, महाराष्ट्र.
अ. ‘आश्रम, म्हणजे एक विश्वविद्यालय आहे.
आ. ‘मी आश्रमातील स्वच्छता, टापटीप, साधकांचे वागणे-बोलणे, भोजनकक्ष इत्यादी पाहिले. तेव्हा ‘व्यवस्थापन शिकण्यासाठी महाविद्यालयात जायला नको. आश्रमात राहून हे सर्व शिकता येईल’, असे मला वाटले.’
२. श्री. रमेश यशवंत भुवड (अध्यक्ष, कुणबी विकास मंच), दापोली, रत्नागिरी, महाराष्ट्र.
अ. ‘आश्रमात आल्यावर मला शांत वाटले.’
३. सौ. वीणा लोकूर (निर्माती, दिग्दर्शिका आणि लेखिका), बेळगाव, कर्नाटक.
अ. ‘येथील साधक हसतमुख आहेत.
आ. येथील सर्वकाही योग्य आणि उच्च स्तरीय आहे.’
४. श्री. लक्ष्मण काशीराम गुरव (जिल्हाध्यक्ष, अखिल गुरव समाज), रत्नागिरी, महाराष्ट्र.
अ. ‘हा सुंदर आश्रम पहायला मिळाला’, हे माझे भाग्य आहे.’
५. श्री. रमेश रामचंद्र कडू (अध्यक्ष, श्री महालक्ष्मी देवस्थान), ब्राह्मणवाडी, रत्नागिरी, महाराष्ट्र.
अ. ‘येथे मला एक वेगळे समाधान मिळाले.
आ. ‘या ठिकाणी परमेश्वराचा वास आहे’, यात शंकाच नाही.’
(सर्व सूत्रांचा दिनांक : २७.६.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |