अंकलेश्वर (गुजरात) – अंकलेश्वर येथील ‘गुजरात औद्योगिक विकास महामंडळ’ वसाहतीतील एका कारखान्यामध्ये अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त करण्यात आलो. सुरत आणि भरूच पोलिसांनी संयुक्तपणे नुकतीच ही कारवाई केली. पोलिसांनी अंकलेश्वरमधील ‘अवसार एंटरप्रायझेस’ नावाच्या कारखान्यावर धाड घालून २५० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले.
या प्रकरणी पोलिसांनी कारखान्याच्या व्यवस्थापकासह तिघांना अटक केली आहे. ७ दिवसांपूर्वीच येथील अन्य एका कारखान्यातून ५ सहस्र कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते.