१. डॉ. (श्रीमती) वनमाला शिंदे (समुपदेशक, खडक पोलीस ठाणे, भाजप महिला आघाडी, समन्वयक, पुणे), एरंडवणा, पुणे, महाराष्ट्र.
अ. ‘येथे मला सूर्यप्रकाशासारखी सात्त्विकता जाणवत आहे.
आ. येथील व्यक्ती आणि वास्तू यांमध्येही मला साक्षात् दैवीवाणीचा अनुभव येत आहे.
इ. काही गोष्टी बघतांना आणि ऐकतांना ‘आपणही या परिवारातीलच आहोत’, असे माझ्या मनात सतत येत राहिले (घर झाले) आहे. ‘ते जन्मोजन्मी राहो’, ही इच्छा !’
२. श्री. श्यामकुमार पुरे (समन्वयक, संकल्प हिंदु राष्ट्र अभियान, छत्रपती संभाजीनगर), महाराष्ट्र.
अ. ‘मला आश्रम पाहून पुष्कळ चांगले वाटले.
आ. मन प्रसन्न होऊन मला पुष्कळ प्रेरणा मिळाली.
इ. मला ‘येथे दैवी शक्तीचा साक्षात् वास आहे’, असा भास झाला.’
(सर्व सूत्रांचा दिनांक : २५.६.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार धर्मप्रेमिंच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |