सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी १२ ऑक्टोबर या दिवशी झालेल्या ‘विजयादशमी’च्या निमित्ताने संदेश दिला. त्यात त्यांनी म्हटले आहे, ‘खरे सीमोल्लंघन, म्हणजे विजय प्राप्त करण्यासाठी शत्रूच्या देशाची सीमा ओलांडून युद्धाचे आव्हान देणे.’
सीमोल्लंघनाच्या वरील व्याख्येचा विचार केला, तर सध्या खर्या अर्थाने इस्रायल हा देश सीमोल्लंघन करत आहे. लेबनॉन या देशाची सीमा ओलांडून ‘हिजबुल्ला’ या जिहादी संघटनेचे आतंकवादी आणि त्यांचे कमांडर यांना ठार करत आहे. काही दिवसांपूर्वीच कमांडर हसन नसरूल्ला याला ठार करण्यासाठी विशेष क्षेपणास्त्राचा वापर केला आणि त्याला ठार मारले. तत्पूर्वी १ सहस्र किलोमीटरपेक्षाही अधिक लांब असलेल्या इराणच्या सेनापतीलाही अचूक वेध घेऊन ठार केले होते. गाझा पट्टीतील ‘हमास’ या आतंकवादी संघटनेचा सर्वोच्च कमांडर इस्माईल हानिया याला ठार केले. थोडक्यात शत्रू कुठेही असला, तरी त्याच्या देशात घुसून त्याला ठार करण्याची विजिगीषु वृत्ती ही इस्रायलमध्ये आहे. हे त्यांनी वारंवार सिद्धही केले आहे. इस्रायलकडून बोध घेऊन असे सीमोल्लंघन भारत कधी करणार ?
– श्री. श्रीराम काणे, इंदूर, मध्यप्रदेश. (१२.१०.२०२४)