मोक्ष केवळ माणसालाच का मिळू शकतो ?

प.पू. स्वामी वरदानंद भारती

मोक्ष हा पुरुषार्थ आपण समजतो तसा इतर ३ पुरुषार्थांप्रमाणे सामाजिक संबंधाने नियंत्रित नाही. तो तत्त्वतः आणि व्यवहारातही वैयक्तिक आहे अन् तो पात्रता असलेल्या कुणाही व्यक्तीला ‘याचि देही याचि डोळा’ हा मुक्तीचा सोहळा भोगणे शक्य आहे. त्यातील कठीणपण परिस्थितीचे नसून प्रवृत्तीचे आहे. दूरता वाटते तीही याच कारणाने आणि स्वतःच्या प्रवृत्तीला योग्य वळण लावणे, हे कोणत्याही माणसास शक्य आहे. म्हणून ‘माणूस इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे’, असे आपले शास्त्रकार मानतात.

– प.पू. स्वामी वरदानंद भारती

(साभार : ग्रंथ ‘मनोबोध’)