नवरात्रोत्सवानिमित्त रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात १५ ते २४.१०.२०२३ या कालावधीत दशमहाविद्या याग पार पडला. (आदिशक्ती माता दुर्गादेवीची दहा रूपे श्री दशमहाविद्या देवता या नावांनी परिचित आहेत.) त्या वेळी मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या कृपेने आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. यागाच्या वेळी सूक्ष्मज्ञानप्राप्तकर्ते श्री. निषाद देशमुख यांच्या भ्रूमध्यावर पुष्कळ तेज दिसणे
सनातन संस्थेमध्ये सेवारत असलेले सूक्ष्मज्ञानप्राप्तकर्ते साधक श्री. निषाद देशमुख (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ३६ वर्षे) यांनी यागाचे सूक्ष्म परीक्षण केले. त्यांना यागासंबंधी जे ज्ञान प्राप्त होत होते, ते ज्ञान ते उपस्थित साधकांना सांगत होते. श्री. निषाद देशमुख हे सांगत असतांना मला त्यांच्या भ्रूमध्यामध्ये अष्टगंधाच्या रंगाचे गोल बिंब दिसू लागले.(अष्टगंधाचा फिकट नारंगी रंग असतो.) पहिल्या दिवशी मला वाटले, ‘त्यांनी अष्टगंधाचा टिळा लावला असेल.’ यासंबंधी मी त्यांना विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘मी गंधाचा टिळा लावला नव्हता.’’ त्या वेळी मला त्यांच्या दोन्ही भुवयांमध्ये पुष्कळ प्रकाश दिसत होता.
२. दसर्याच्या दिवशी यागाच्या वेळी वातावरणात उष्मा असूनही पूर्णाहुती झाल्यावर गारवा जाणवणे
दसर्याच्या दिवशी याग चालू असतांना मला पुष्कळ उष्मा जाणवत होता; पण पूर्णाहुती झाल्यावर वातावरणात गारवा जाणवू लागला. तेव्हा माझे मन हलके होऊन निर्विचार झाले.
मला या अनुभूती दिल्याबद्दल मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– श्रीमती गीता प्रभु, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.१०.२०२३)
|