साधिकेला श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ सूक्ष्मातून समवेत असल्याच्या संदर्भात येत असलेल्या अनुभूती

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

१. मी झोपेतून जागी झाल्यावर मला सर्वप्रथम श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे सूक्ष्मातून दर्शन होते. मला ‘त्या मार्गदर्शन करत आहेत’, असे दिसते.

२. माझ्या भ्रमणभाषच्या पडद्यावर (स्क्रीनवर) त्यांचे छायाचित्र आहे. मी निराश असतांना ‘त्या छायाचित्रातील श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ मला ‘उठ. सेवेला चल !’, असे म्हणत असल्याचे जाणवते. त्यांच्या बोलण्याने मी भानावर येते.

३. अनेक वेळा ‘मला केवळ त्यांचे स्मरण झाले, तरीही चैतन्य आणि वेगळाच आनंद मिळतो’, असे वाटते.

४. ‘त्या सूक्ष्मातून सतत माझ्या समवेत आहेत’, असे मला वाटते.

५. ‘त्याच मला साधनेत पुढे घेऊन जाणार आहेत’, अशी जाणीव त्यांच्याच कृपेने मला होते.

‘प.पू. गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेने मला या अनुभूती आल्या’, त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– श्रीमती अलका योगेश व्हनमारे, सोलापूर (१२.०७.२०२४)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक