प्रार्थना म्हणजे काय ?

प.पू. स्वामी वरदानंद भारती

प्रार्थना म्हणजे काही केवळ शब्दोच्चारात्मक कर्मकांड नव्हे. ‘विशिष्ट पद्धतीने शब्दांचा उच्चार केला, म्हणजे प्रार्थना झाली’, असे कुणी मानत नाही, निदान मानू तरी नये. प्रार्थनेमध्ये प्रेमभाव, आदर, श्रद्धा, निष्ठा हे गुण अंतरंगात असावे लागतात, म्हणजे मग शब्दातील अर्थाला अनुसरून सहजपणे कृती घडते. प्रार्थनेतील शब्द हे प्रयत्नाला दिशा दाखवणारे, जीवनाला प्रेरणा देणारे आणि प्रतिकूल परिस्थितीतही धैर्य अन् उत्साह टिकवून ठेवणारे असतात.

– प.पू. स्वामी वरदानंद भारती (साभार : ग्रंथ ‘संघप्रार्थना’)