‘मी देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात राहून पूर्णवेळ सेवा करत आहे. गुरुकृपेने मला वेगवेगळ्या सेवा करण्याची संधी मिळते. एखादी नवीन किंवा अवघड सेवा आल्यावर माझ्या मनात ‘मला ही सेवा करायला जमेल का ?’, असा विचार येतो; परंतु सेवा पूर्ण झाल्यावर ‘ही सेवा मी केली नाही, तर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी करून घेतली आहे’, याची मला जाणीव होते. यासंदर्भात मला आलेल्या काही अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. पूर्वी कधी न केलेली सेवाही सहजपणे करता येणे
आश्रमात एकदा मला विद्युत्जनित्राची (‘जनरेटर’ची) दुरुस्ती करण्यास सांगितले होते. यापूर्वी मी कधीही ती सेवा केली नव्हती. असे असूनही मला ती सेवा सहजपणे करता आली.
२. संगणकांमध्ये अकस्मात् अडचणी आल्यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांना प्रार्थना करणे आणि तत्क्षणी अडचण सुटणे
आश्रमात संगणकांच्या दुरुस्तीची सेवा करतांना अकस्मात् काही नवीन अडचण येते. त्या वेळी आरंभी माझ्या मनात विचार येतो, ‘ही सेवा करायला मला जमेल का ?’ नंतर सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांना प्रार्थना करून सेवा चालू केल्यावर ती अडचण सहजतेने सुटते. तेव्हा ती अडचण कशी सुटली ?, हे कळत नाही.
अशा अनुभूती मला वरचेवर येतात. सेवा करतांना सर्व प्रकारे प्रयत्न करून एखादी अडचण न सुटल्यास मी गुरुदेवांना प्रार्थना करतो. तेव्हा ते कुणाच्यातरी माध्यमातून काही उपाय सुचवतात. त्यांचा विचार ग्रहण करून तशी कृती केल्यावर ती अडचण सहजतेने सुटते.
‘हे गुरुदेवा, आपण मला सेवा करण्याची संधी देता आणि ती सेवा आपणच माझ्याकडून करून घेता. त्याबद्दल कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. मयूर हराळे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३०.६.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |