|
मुंबई – राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाची धनश्री सहस्रबुद्धे या महिलेने तोडफोड केली. संबंधित महिला पास न काढता सचिवांसाठीच्या प्रवाशद्वारातून मंत्रालयात शिरली होती. तोडफोड करून ती निघून गेली. या घटनेचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे. तिने फडणवीस यांच्या नावाची पाटीही काढून फेकून दिली. पोलिसांना १८ घंट्यांनंतर महिलेची ओळख पटवण्यात यश आले आहे. तिची मानसिक स्थिती चांगली नसल्याचे सांगितले जात आहे.
A woman vandalizes Home Minister Devendra Fadnavis’ office in Mantralaya.
▫️ The woman entered the building through the secretary’s entrance without taking a pass.
👉 This raises serious concerns about the security system.#ViralVideo #CCTV pic.twitter.com/0slhxeYIRe
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 27, 2024
यासंदर्भात देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘कार्यालयात नासधूस झाल्याची घटना २६ सप्टेंबरची आहे. त्या महिलेचे काय म्हणणे होते ? तिने हे कशासाठी केले ?, हे जाणून घेईन. उद्विगनतेमधून तिने हे कृत्य केले का ? किंवा तिची व्यथा काय आहे ?, हेही समजून घेण्याचा प्रयत्न करीन.’’
महिला मानसिक रुग्ण ! – अक्षता तेंडुलकर, माहीम विधानसभा अध्यक्षा, भाजप
भाजपच्या माहीम विधानसभेच्या अध्यक्षा अक्षता तेंडुलकर म्हणाल्या, ‘‘ही महिला मानसिक रुग्ण असल्याचे तिचे शेजारी सांगतात. त्यामुळेच तिचे कुटुंबीय तिला सोडून इतरत्र रहातात. तिच्याकडे नेहमी एक मोठा सुरा असतो. ती सोसायटीत बांबू घेऊन फिरते. तिला अभिनेता सलमान खानशीत लग्न करायचे आहे. ती याआधी माझ्याही कार्यालयात अनेकदा येऊन गोंधळ घालायची. काही दिवसांपूर्वी माझ्या वाढदिवसाचा फलक तिने फाडला होता. तिचा कुठल्याही पक्षावर राग नाही. ती स्वतः भाजपची समर्थक असून भाजपशी संबंधित पोस्ट ती सामाजिक माध्यमांवर प्रसारित करत असते.’’