वक्फ बोर्डाच्या विधेयकाला ‘गुलशन फाऊंडेशन’चे समर्थन, तर तृणमूल काँग्रेसचा विरोध !

संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीत वादावादी

मुंबई – ‘वक्फ बोर्डा’च्या संदर्भातील विधेयकाच्या संदर्भातील संयुक्त संसदीय समितीची बैठक २६ सप्टेंबर या दिवशी पार पडली. या बैठकीत ‘गुलशन फाऊंडेशन’च्या प्रतिनिधीने वक्फ विधेयकाचे समर्थन करणारे वक्तव्य केले. त्या वेळी तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी त्यांना विरोध केला. त्यानंतर शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी कल्याण बॅनर्जी यांना विरोध करून थांबवले. या वेळी जोरदार वादावादी झाली. त्यानंतर त्या दोघांना बैठकीतून बाहेर काढण्याचा निर्णय विरोधी पक्षांनी घेतला; परंतु त्यानंतर बैठक एकदा थांबवून ती परत चालू करण्यात आली.

मोदी शासनाने वक्फ कायद्यात सुधारणा करून ४० नवीन नियमांचे त्यात प्रावधान केले आहे. त्यामुळे कुठलीही संपत्ती वक्फ बोर्डाची संपत्ती बनण्यावर अंकुश येणार आहे. हे विधेयक संमत झाल्यास वक्फ बोर्डाच्या संपत्तीचे व्यवस्थापन आणि हस्तांतर यांतील नियमांमध्ये मोठे पालट होणार आहेत. ‘वक्फ’ हा अरबी शब्द असून त्याचा अर्थ ‘थांबवणे’ किंवा ‘समर्पण करणे’ असा आहे.