१. सौ. स्वाती सोळंके, लातूर
१ अ. ब्रह्मोत्सवाला जाण्यासाठी प्रवासात जैन धर्मशाळेत अल्प मूल्यात निवासाची सोय होणे : ‘लातूरहून आम्ही ८ जण ब्रह्मोत्सवासाठी चारचाकी वाहन करून गोव्याला जाणार होतो. लातूरहून गोव्याचा प्रवास लांबचा असल्यामुळे मध्येच कुठेतरी निवासाची सोय होणे आवश्यक होते. सांगलीच्या साधकांच्या माध्यमातून जयसिंगपूरजवळ उदगाव येथील जैन धर्मशाळेत आमच्या निवासाची अल्प मूल्यात सोय झाली. आम्ही तिथे थांबून विश्रांती घेतली आणि सकाळी आवरून पुढे निघालो. यामुळे आम्हाला विश्रांती मिळून प्रवासाचा त्रासही झाला नाही.’
२. श्री. हिरालाल तिवारी (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ५९ वर्षे), सोलापूर
२ अ. बस वाहतूकदार आणि मंगल कार्यालयाच्या मालकानेही अल्प मूल्यात सोयी उपलब्ध करून देणे अन् बसच्या मालकाने ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभेसाठी बसची आवश्यकता लागली, तर सेवा म्हणून साहाय्य करीन’, असे सांगणे : ‘सोलापूर येथून ब्रह्मोत्सवाला जाण्यासाठी खासगी बस मिळतील कि नाही ?’, असे मला वाटत होते. एका खासगी बस वाहतूकदाराने ५ बस नेहमीच्या प्रचलित मूल्यापेक्षा अल्प मूल्यात उपलब्ध करून दिल्या. तसेच प्रवास करतांना साधकांना थांबून आवरणे आणि अंघोळ करणे यांसाठी एका मंगल कार्यालयाचा संपर्क दिला. मंगल कार्यालयाच्या मालकाने साधकांसाठी अल्प मूल्यात सोयी उपलब्ध करून दिल्या. तसेच बसच्या मालकांनी ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा किंवा अन्य कार्यक्रमासाठी बसची आवश्यकता वाटल्यास पुन्हा संपर्क करा; म्हणजे मी तुम्हाला सेवा म्हणून साहाय्य करीन’, असे सांगितले.’