नागपूर – इयत्ता दहावीत शिकणार्या विद्यार्थिनीची एका मिरवणुकीत गवंडीकाम करणार्या युवकाशी ओळख झाली. त्याने तिला त्याचा भ्रमणभाष क्रमांक दिला. त्यानंतर त्यांची मैत्री होऊन प्रेम जुळले. विद्यार्थिनीला अभ्यासाची भीती वाटत होती. ‘परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास पालक शिक्षण बंद करतील’, असेही तिला वाटत होते. त्यामुळे युवकाने तिला घर सोडण्याचा सल्ला दिला. त्याचे ऐकून मुलगी घरातून पळून गेली आणि प्रियकराच्या घरी गेली. मुलगी अचानक बेपत्ता झाल्यामुळे आई-वडिलांना धक्का बसला.
पोलिसांत तक्रार करून शोधाशोध चालू केल्यावर ती एका उद्यानात प्रियकराच्या समवेत बसलेली आढळली. पोलिसांनी तिचे समुपदेशन करून तिला आई-वडिलांकडे सोपवले.
संपादकीय भूमिका :पालकांनो, आपली मुले कुणाच्या संपर्कात आहेत, याकडे बारकाईने लक्ष ठेवा ! |