श्री गणेशचतुर्थीच्या काळात ध्येय ठेवल्याने श्री गणेशाच्या कृपेमुळे १५ स्वयंसूचना सत्रे पूर्ण होऊ शकणे

सौ. शोभा धडके

१. व्यष्टी साधनेच्या आढावा सत्संगात सांगितल्याप्रमाणे दिवसभरात १५ स्वयंसूचना सत्रे पूर्ण होत नसल्याने वाईट वाटणे

‘व्यष्टी साधनेच्या आढावा सत्संगात दिवसभरात मला १५ स्वयंसूचना सत्रे पूर्ण झाली पाहिजेत’, असे सांगितले होते. त्याप्रमाणे माझे प्रयत्न चालू होते; परंतु माझी एका दिवसाला अधिकाधिक ८ ते १० अशी स्वयंसूचना सत्रे होत होती. दुपारनंतर माझी प्राणशक्ती पुष्कळ न्यून होत असल्याने माझी साधनेचे प्रयत्न अल्प पडत असत. त्यामुळे मला पुष्कळ रडू येत असे.

२. स्वयंसूचना सत्रे अधिक होण्याविषयी देवासमोर हट्ट केल्यावर त्याने कर्तेपणा सोडण्यास सांगणे

मी रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात सूक्ष्मातून जाऊन देवासमोर संपूर्ण शरण गेले आणि हट्ट धरला. तेव्हा देवाने मला ‘कर्तेपणा सोड’, असे सांगितले. त्याप्रमाणे दिवसभराचा संपूर्ण कर्तेपणा देवाकडे सोडून मी रात्री घरी आले. लिखाण करतांना ध्येय घेतले की, ‘उद्यापासून १५ स्वयंसूचना सत्रे झाली पाहिजेत.’ देवाला प्रार्थना करून मी झोपले.

३. श्री गणेशचतुर्थीच्या चौथ्या दिवशी सकाळी ६ वाजता प्रथम स्वयंसूचना सत्र घेणे आणि दिवसभर प्रत्येक घंट्याला एक स्वयंसूचना सत्र घेणे

हे सर्व श्री गणेशचतुर्थीनंतर झाले. बाप्पाला येऊन ३ दिवस झाल्यानंतर मी हे ध्येय घेतले. चौथ्या दिवशी पहाटे ५.४८ वाजता देवाने मला उठवले. त्यानंतर मी लगेच माझे आवरण काढून, अत्तर आणि कापूर यांचे उपाय करून नामजप शोधून काढला आणि सकाळी ६ वाजता प्रथम स्वयंसूचना सत्र केले. त्याप्रमाणे प्रत्येक घंट्याला स्वयंसूचना सत्र केले.

४. गणेशतत्त्व कार्यरत असल्याने साधिकेची प्राणशक्ती न्यून होत नसून ध्येयाप्रमाणे १५ स्वयंसूचना सत्रेही पूर्ण होणे

मी एका साधिकेला म्हणाले, ‘‘आता माझी प्राणशक्ती अल्प होत नाही. काल माझी १६ स्वयंसूचना सत्रे झाली आणि आज रात्री ८ वाजेपर्यंत माझी १५ स्वयंसूचना सत्रे पूर्ण झाली. तेव्हा त्या साधिकेने मला सांगितले, ‘‘गणेशतत्त्व कार्यरत असल्याने तुमची प्राणशक्ती न्यून होत नाही आणि ध्येय घेतल्याप्रमाणे १५ स्वयंसूचना सत्रेही पूर्ण होत आहेत.’’ तेव्हा, ‘गणपतीबाप्पाने माझी प्रार्थना ऐकली होती आणि त्याच्याच कृपेमुळे मी १५ स्वयंसूचना सत्रे पूर्ण करत आहे’, हे माझ्या लक्षात आले.

त्याबद्दल श्री गणेश आणि गुरुदेव यांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. शोभा शंकर धडके, वांद्रे, मुंबई. (२३.९.२०२३)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक