India US Loyalty Test : दर ५ मिनिटांनी भारत आमच्यावरील विश्‍वासाची परीक्षा घेऊ शकत नाही ! – अमेरिका

अमेरिकेच्या माजी परराष्ट्र सचिव कोंडोलीझा राईस

वॉशिंग्टन : आम्ही दर ५ मिनिटांनी भारत आमच्यावर विश्‍वास आहे कि नाही, याची परीक्षा घेऊ शकत नाही, असे विधान अमेरिकेच्या माजी परराष्ट्र सचिव कोंडोलीझा राईस यांनी केले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या २ महिन्यांत रशिया आणि युक्रेन या देशांचा दौरा केला. पंतप्रधान मोदी यांच्या रशियाच्या भेटीनंतर भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंंध बिघडल्याची चर्चा चालू होती. त्या पार्श्‍वभूमीवर कोंडोलीझा राईस यांनी वरील विधान केले. अमेरिकेतील जॉर्ज डब्ल्यू. बुश सरकारच्या कारकीर्दीत भारत आणि अमेरिका यांच्यात नागरी अणू करार पुढे नेण्यात राईस यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती.

राईस पुढे म्हणाल्या की,

संरक्षणक्षेत्रात भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध भक्कम, द्विपक्षीय आणि दीर्घकाळ टिकणारे आहेत. अमेरिकेतील ‘व्हाईट हाऊस’मध्ये येणार्‍याला या संबंधांचे महत्त्व लक्षात येते. भारताला धोरणात्मक स्वायत्तता हवी आहे आणि त्यात काहीही चुकीचे नाही; पण आमच्यातील (भारत आणि अमेरिका यांच्यातील) संबंध हितकारी अन् सक्षम आहेत.