नवी देहली – शाळा सुटल्यावर घरी जाण्यासाठी वर्गाबाहेर पडलेल्या एका ६ वर्षांच्या बालिकेला अडवून तिला एका निर्जन ठिकाणी नेले. यानंतर तिला अयोग्य पद्धतीने स्पर्श केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी अमीर नावाच्या एका कामगाराला अटक केली. वरील घटना ३ सप्टेंबरला दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली.
Bad Touch: Amir arrested for inappropriately touching a 6-year-old girl.
The government should punish such lustful people in a way that they learn a fitting lesson for life! pic.twitter.com/24vCgaL4BX
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 10, 2024
१. वरील घटना घडल्यानंतर मुलगी घाबरली आणि तिने त्याचा हात झटकून तिच्या वर्गाकडे धावत सुटली. ती वर्गाबाहेर तिच्या शिक्षिकेला भेटली आणि घटना सांगितली.
२. त्या निरागस बालिकेचे बोलणे ऐकून वर्गशिक्षकाही स्तब्ध झाल्या. त्यांनी लगेच तिला मुख्याध्यापकांकडे नेले; मात्र मुख्याध्यापक आणि इतर पदाधिकारी यांनी पोलिसांत तक्रार करण्याऐवजी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत ओरोपी शाळेतून पळून गेला.
३. यानंतर त्या बालिकेने घरी जाऊन घडलेला सर्व प्रकार पालकांना सांगितला. पालकांनी तातडीने पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी तातडीने कारवाई करत दुसर्याच दिवशी शाळेचे मुख्याध्यापक, वर्ग शिक्षक, पर्यवेक्षक आणि कंत्राटदार यांना अटक केली.
४. पोलिसांनी अमीरची सीसीटीव्हीद्वारे ओळख पटवून त्याला उत्तरप्रदेशमधील फिरोजाबाद येथील त्याच्या घरातून अटक केली. त्याच्याविरुद्ध ‘पॉक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
संपादकीय भूमिकासरकारने अशा वासनांधांना जन्माची अद्दल घडेल, अशी शिक्षा द्यायला हवी ! |