फुप्फुसांची क्षमता सुधारण्यासाठी प्राणायाम आणि श्वसनाचे प्रकार नियमित करावेत !

सध्याच्या आधुनिकीकरणात उद्भवलेल्या शारीरिक समस्यांवर उपाय म्हणून ‘व्यायाम’ हे एक प्रभावी माध्यम ठरले आहे. सध्या होत असलेल्या अनेक शारीरिक समस्यांवर औषधोपचारासह अनेक पर्याय निवडले जातात; पण व्यायामाविना या सर्व उपाययोजना अपूर्ण ठरतात. या सदरातून आपण व्यायाम करण्याची आवश्यकता आणि महत्त्व जाणून घेणार आहोत, तसेच व्यायामाविषयीच्या शंकांचे निरसन करणार आहोत.               

(भाग ७)

‘शरिराचे कार्य चालू रहाण्यासाठी आवश्यक असलेला प्राण (प्राणवायू) शरिराला पुरवण्याचे कार्य फुप्फुसे करतात. हा प्राणवायू शरिरातील प्रत्येक पेशीला कार्य करण्याची ऊर्जा प्रदान करतो, तसेच शरिरातील अनावश्यक घटक जाळून शरिराची अंतर्गत शुद्धीही करतो. जितक्या अधिक प्रमाणात प्राणवायू शरिरात येतो, तितकी शरीर निरोगी रहाण्याची शक्यता अधिक असते; पण सर्वसाधारण व्यक्ती फुप्फुसांची क्षमता केवळ १० ते १२ टक्के वापरते.

कु. वैदेही शिंदे

व्यायामाची परिणामकारकता फुप्फुसांच्या क्षमतेवर अवलंबून असते. फुप्फुसांची क्षमता सुधारल्याने सर्वच अवयवांची निरंतर कार्यवृद्धी होऊन थकवा न्यून होतो. ‘फुप्फुसांची क्षमता आणि श्वसनाची पद्धत सुधारण्यासाठी प्रयत्न करणे’, हे व्यायामाचे एक अविभाज्य अंग आहे. यासाठी प्राणायाम आणि श्वसनाचे प्रकार नियमित करावेत.’

– कु. वैदेही राजेंद्र शिंदे, भौतिकोपचार (फिजिओथेरपी) अभ्यासक, फोंडा, गोवा. (२.९.२०२४)