मॉस्को (रशिया) – रशियाने युक्रेनच्या पोल्टावा शहरावर २ बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी केलेल्या आक्रमणात ५१ जणांचा मृत्यू, तर २७१ जण घायाळ झाल्याचा दावा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेंस्की यांनी केला आहे. या आक्रमणानंतर पोल्टावामध्ये ३ दिवसांचा दुखवटा घोषित करण्यात आला आहे.
झेलेंस्की म्हणाले की, रशियाने त्यांच्या एका शैक्षणिक संस्थेला आणि रुग्णालयांना लक्ष्य केले. यात इमारतरींची मोठी हानी झाली. याच्या ढिगार्याखाली अनेक नागरिक गाडले गेले.