पाचल (राजापूर), १ सप्टेंबर (वार्ता.) – देश-विदेशांमध्ये दर्जेदार उत्पादनासाठी प्रसिद्ध असणार्या ‘पितांबरी’ आस्थापनाच्या सौजन्याने पाचल परिसरातील ६४ देवळांमध्ये धर्मशिक्षण देणारे १७० फ्लेक्स फलक प्रदर्शित करण्यात आले आहेत. त्यामुळे येथील श्रद्धावान जिज्ञासू समाधान व्यक्त करून पितांबरी आस्थापनाला धन्यवाद देत आहेत.
‘पितांबरी प्रायव्हेट लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई धार्मिक गोष्टींना नेहमीच प्रोत्साहन देत असतात, हे समजल्यानंतर हिंदु जनजागृती समितीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना पाचल परिसरातील देवळांमध्ये त्यांच्या सौजन्याने धर्मशिक्षण देणारे फ्लेक्स फलक प्रायोजित करण्याविषयी सुचवले. त्याला त्यांनी विनाविलंब होकार दिला.
त्यानुसार परिसरातील १९ गावांतील ६४ देवळांमध्ये ग्रामदेवतेच्या पूजनाचे महत्त्व ! ग्रामदेवतेचे दर्शन कसे घ्यावे ? देवाच्या दर्शनापूर्वी काय करावे ? देवतेचे दर्शन कसे घ्यावे ? याविषयी माहिती देणारे २×३ फूट आकाराचे १७० फलक लावण्यात आले.
अभिप्राय
|