नागपूर – येथे अर्थव्यवस्थेला धोका निर्माण करणार्या बनावट नोटा चलनात आणणारी टोळी सक्रीय झाल्याची माहिती प्रसारित झाली आहे. मतदारांना आमीष दाखवण्यासाठी या नोटांचा वापर होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
बनावट नोटांचे चलन रोखण्यासाठी ‘नोटबंदी’ करण्यात आली. त्यानंतर नवीन नोटा चलनात आल्या. आता या नवीन नोटांचेही बनावटीकरण चालू झाले आहे. ही टोळी १०० रुपयांची नोट ५० ते ६० रुपयांना देत असून यात महाविद्यालयीन तरुण-तरुणींचा समावेश असल्याचे समजते.