|
थिरूवनंतपूरम् (केरळ) – न्यायमूर्ती हेमा समितीने अभिनेत्रींच्या लैंगिक शोषणाच्या संदर्भातील बनवलेला अहवाल आता उघड झाल्यानंतर मल्ल्याळम् चित्रपटसृष्टीत गदारोळ निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर मल्ल्याळम् अभिनेत्री रेवती संपत यांनी या चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सिद्दीकी आणि अभिनेते रियाज खान यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यानंतर मल्ल्याळम् चित्रपट कलाकार संघटनेचे मुख्य सचिव असलेले सिद्दीकी यांनी त्यांच्या पदाचे त्यागपत्र दिले आहे. ‘चित्रपटसृष्टीतील सर्वांना न्याय मिळवून देऊ’ असे आश्वासन देणारे सिद्दिकी यांनी काही घंट्यांतच त्यागपत्र दिले. अध्यक्ष मोहनलाल यांना पत्राद्वारे त्यांनी त्यागपत्र पाठवले आहे. अभिनेते सिद्दीकी यांच्यावर वर्ष २०१९ मध्ये अभिनेत्री रेवती संपत यांनी बलात्काराचा गंभीर आरोप केला होता; मात्र त्या वेळी हे प्रकरण फारसे चर्चेत आले नव्हते. आता हेमा समितीचा अहवाल सिद्ध झाल्यानंतर त्यांनी पुन्हा सिद्दीकी यांच्यावर आरोप केला.
Actress Revathi Sampath accuses actor Siddique of rape
Case of unethical relationships in the Malayalam film industry in Kerala
Actor Riyaz Khan had asked an obscene question
No matter how prominent they become, their inherent depraved nature remains unchanged—keep this in… pic.twitter.com/RspsI2MPSx
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 27, 2024
रेवती संमत यांनी आरोप केला की, वर्ष २०१६ मध्ये सामाजिक माध्यमांद्वारे सिद्दीकी यांनी माझ्याशी संपर्क साधला होता. अभिनयात माझी आवड लक्षात घेऊन सिद्दीकी यांनी मला त्यांच्या चित्रपटांमध्ये संधी देण्याच्या निमित्ताने जवळीक वाढवली होती. सिद्दीकी यांच्या चित्रपटाच्या ‘प्रीमियर शो’साठी मला आमंत्रित केले होते. कार्यक्रमानंतर त्यांनी मला थिरूवनंतपूरम्मधील हॉटेल ‘मस्कत’ येथे नेले आणि हॉटेलच्या खोलीत माझ्यावर बलात्कार केला. त्यांच्या मुलाच्या चित्रपटामध्ये काम करण्याविषयी बोलण्यासाठी सिद्दीकी यांनी माझ्याशी संपर्क साधला होता. त्यांनी मला मुलगी म्हणून संबोधल्यामुळे मला काही शंका आली नाही आणि मी त्यांच्यासोबत गेले; परंतु हॉटेलच्या खोलीमध्ये नेऊन त्यांनी अनुचित कृत्य केले. माझ्यावर लैंगिक अत्याचार केला. त्या भीषण घटनेमुळे मी अद्याप सावरलेली नाही. अभिनेते सिद्दीकी अतिशय नीच व्यक्ती आहेत. माझ्या काही मैत्रिणींवरही त्यांनी लैंगिक अत्याचार केले आहेत.
अभिनेते रियाज खान यांच्यावरही आरोप
अभिनेता रियाज खान यांच्यावरही अभिनेत्री रेवती संपत यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्या म्हणाल्या की, एका छायाचित्रकाराकडून माझा क्रमांक मिळवून रियाज खान याने दूरभाषवरून ‘शारीरिक संबंध ठेवायला आवडतोे का ?’ असे विचारले होते.
अभिनेत्रींच्या लैंगिक शोषणाच्या चौकशीसाठी विशेष अन्वेेषण पथकाची स्थापना !
थिरूवनंतपूरम् – मल्ल्याळम् चित्रपटसृष्टीतील लैंगिक शोषणाच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी केरळ सरकारने वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या नेतृत्वाखाली विशेष अन्वेषण पथकाची (एस्.आय.टी.ची) स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. १९ ऑगस्ट या दिवशी उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश के. हेमा यांनी मल्ल्याळम् चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींसोबतच्या गैरवर्तणुकीविषयी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन् यांना २९५ पानी अहवाल सादर केला होता.
या अहवालात मल्ल्याळम् चित्रपट उद्योगात कास्टिंग काउच (चित्रपटात संधी मिळण्यासाठी अभिनेत्रींनी संबंधितांच्या शारीरिक गरजा पूर्ण करणे) आणि लैंगिक छळ यांसारख्या गंभीर समस्यांचा उल्लेख होता. चित्रपटांतील अभिनेते मनमानीपणे वागतात, निर्माते भूमिकेच्या बदल्यात शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करतात, असे या अहवालात म्हटले होते.
संपादकीय भूमिकाधर्मांध कितीही मोठे झाले, तरी त्यांची मूळ वासनांध वृत्ती जात नाही, हे लक्षात घ्या ! इतर वेळी शरीयत कायद्याचे गुणगान करणारे मुसलमान नेते आता या अभिनेत्यांना शरीयतनुसार शिक्षा करण्याची मागणी करणार का ? |