पैठण (जिल्हा छत्रपती संभाजीनगर) – येथील प्रसिद्ध संत ज्ञानेश्वर उद्यान अनेक वर्षांपासून बंद पडले आहे. सध्या उद्यानात २७ कोटी रुपये व्यय करून विविध कामे चालू आहेत.
या कामाची पहाणी २२ ऑगस्ट या दिवशी माजी सभापती विलास भुमरे यांनी केली. या वेळी एका मासात उद्यान पहिल्या टप्प्यात चालू करण्यात यावे, अशी सूचना त्यांनी अधिकार्यांना केल्या.
उद्यानासाठी मागील दीड वर्षांत पर्यटन, जिल्हा नियोजन यांसह राज्य सरकारने आजपर्यंत २७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला; मात्र यातून जी कामे झाली अन् होत आहेत ती कामे निकृष्ट झाल्याचे समोर आले होते. माजी सभापती विलास भुमरे यांनी संबंधित ठेकेदार आणि अधिकारी यांना सूचना करत उद्यानातील कामे दर्जेदार करून उद्यान पहिल्या टप्प्यात १ मासात चालू होईल याचे नियोजन करण्याच्या सूचना केल्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्यानाच्या कामासाठी १४९ कोटी रुपये मान्य केले आहेत. या कामाची निविदा ८ दिवसांत निघणार आहे.