महिलेच्या तक्रारीची घेतली नोंद !
अहिल्यानगर – राहुरीतील एका महिलेकडून सेतू केंद्रचालकाने १ सहस्र रुपयांची मागणी केली. महिलेने तहसीलदार नामदेव पाटील यांच्याकडे सेतू केंद्रचालकांच्या विरोधात तक्रार केली. तक्रारीची नोंद घेत तहसीलदार महिलेसह सेतू केंद्रामध्ये गेले. त्यांनी केंद्रचालकाच्या त्या कृत्याविषयी खडसावले. केंद्रांमध्ये नागरिकांकडून अधिकचे पैसे घेतले जातात, अशा तक्रारी येतात. त्यामुळे केंद्रचालकाला कोणत्या कामासाठी किती पैसे द्यावे लागतात, याचा फलक लावण्याचे आदेश संबंधित अधिकार्यांना द्यावेत, अशी मागणी नागरिक करत आहेत. (अशी मागणी का करावी लागते ? – संपादक)