सात्त्विकतेची ओढ असणारी सानपाडा (नवी मुंबई) येथील चि. प्रणिका रोहित केणी (वय दीड वर्ष) !

चि. प्रणिका रोहित केणी हिची तिची आजी (वडिलांची आई) सौ. अपर्णा केणी यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

चि. प्रणिका केणी

१. जन्मापूर्वी

सौ. अपर्णा केणी

१ अ. गर्भारपणात सुनेने सनातनच्या ग्रंथांचे वाचन आणि नामजप करणे : ‘माझी सून सौ. संजीवनी रोहित केणी लग्नापूर्वी साधना करत नव्हती. लग्न झाल्यानंतर मागील दीड वर्षापासून तिने साधनेला आरंभ केला आहे. सौ. संजीवनी गर्भवती असतांना मी तिला सनातनच्या ग्रंथांचे वाचन आणि नामजप करायला सांगितला होता. तेव्हा सौ. संजीवनी प्रयत्नपूर्वक नामजप आणि ग्रंथवाचन करत असे.

१ आ. अनुभूती : सौ. संजीवनीला घरकाम करतांना अधूनमधून चंदनचा सुगंध येत असे.

२. जन्म

२ अ. संजीवनीची हरतालिकेच्या दिवशी प्रसुती झाली. ‘बाळ ‘पार्वती’ च्या रूपाने आमच्या घरी आले’, असे मला वाटले.

३. जन्म ते ६ मास

३ अ. बाळ चि. प्रणिका जन्मापासूनच पुष्कळ हुशार आहे.

३ आ. ती जन्मापासून अंगठा आणि तर्जनी यांनी तेजतत्त्वाची मुद्रा करून झोपते.

३ इ. चि. प्रणिका रडत असतांना तिला देवाजवळ नेल्यावर किंवा नामजप ऐकवल्यावर शांत होणे : चि. प्रणिका दुपारच्या वेळेत रडत असेल, तर तिचे आजोबा (श्री. रवींद्र केणी) तिला देवघरात नेऊन देवघरातील देवतांची चित्रे दाखवतात. देवतांच्या चित्रांकडे बघत ती शांत होते. अन्य वेळी ती रडत असतांना मी ‘श्रीरामाचा पाळणा’ म्हणते, तेव्हाही ती शांत होते. ती कधी रात्री रडत असेल, तर संजीवनी तिच्या बाजूला भ्रमणभाषवर ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप लावून ठेवते. तो नामजप ऐकतांनाही प्रणिका शांत होते.

४. वय ७ मास ते १ वर्ष

४ अ. सात्त्विकतेची ओढ

४ अ १. देवतांचा नामजप करण्याचा प्रयत्न करणे : मी नामजपाला बसल्यावर ती माझ्या बाजूला बसते. तिला बोलता येत नाही; पण स्वतः काहीतरी गुणगुणत असते. घरामध्ये लावलेला ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप ऐकत ती तिच्या बोबड्या बोलाने म्हणते. मी ‘जय श्रीराम’ म्हटल्यावर ती लगेचच तिचे दोन्ही हात वर करून मोठ्याने आवाज करते.

४ अ २. साधकांना पाहून आनंद होणे : सानपाडा (नवी मुंबई) येथे माझ्या घरी सत्संगासाठी साधक आल्यावर तिला पुष्कळ आनंद होतो. घरी आलेल्या साधकांना ती बसूनच वाकून नमस्कार करते. ती सत्संग झाल्यावर घरी जाणार्‍या साधकांच्या मागे लागते.

४ अ ३. सत्संग संपेपर्यंत तेजतत्त्वाची मुद्रा करून शांत बसून रहाणे : ती साधकांकडे बघून पुष्कळ प्रेमाने हसते. सत्संग चालू असतांना ती माझ्या बाजूला तेजतत्त्वाची मुद्रा करून शांत बसते.

४ अ ४. भक्तीसत्संग आरंभापासून शेवटपर्यंत शांतपणे ऐकणे : ती गुरुवारी असलेला भक्तीसत्संग आरंभापासून शेवटपर्यंत शांतपणे ऐकते. भक्तीसत्संगातील भावगीत ऐकतांना ती तिचे दोन्ही हात वर करून आनंदाने हसून नाचते. सत्संग चालू असतांना ती झोपत नाही; मात्र सत्संग संपल्यावर ती लगेचच झोपते.

४ अ ५. तिला सात्त्विक कपडे घालायला पुष्कळ आवडतात. 

५. स्वभावदोष

हट्टीपणा, राग येणे

‘प.पू. गुरुमाऊली, आपल्याच कृपेने चि. प्रणिकाची गुणवैशिष्ट्ये माझ्या लक्षात आली आणि तुम्हीच ती माझ्याकडून लिहून घेतलीत’, यासाठी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. अपर्णा रवींद्र केणी (चि. प्रणिकाची आजी (वडिलांची आई)), सानपाडा, नवी मुंबई. (८.९.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.